विवाहिता छळप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 2, 2015 02:18 IST2015-06-02T02:18:56+5:302015-06-02T02:18:56+5:30
मोताळा तालुक्यातील घटना.

विवाहिता छळप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
मोताळा (जि. बुलडाणा) : विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरुद्ध १ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सिंदखेड येथे राहणार्या रुपाली राजेंद्र खडके या विवाहितेने ३१ मे रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, या तक्रारीत म्हटले आहे की, पती राजेंद्र खडके, सासू गुंफाबाई खडके, जेठ प्रकाश खडके, जेठानी ज्योती, दीर विलास खडके सर्व रा. जामनेर, जिल्हा जळगाव हे आपला शारीरिक व मानसिक छळ करून शिवीगाळ करीत वारंवार त्रास देत होते. या बाबत विवाहितेने तक्रार केली असता, सासरकडील मंडळींनी समजूत घालून वाद मिटविला होता; मात्र असा प्रकार वारंवार होत असल्याने व त्रास असहय़ झाल्याने रुपाली हिने धामणगाव बढे पोलिसात सदर आरोपींविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीवरून धा. बढे पोलिसांनी संबंधित विवाहितेचा पती राजेंद्र खडके, सासू गुंफाबाई खडके, जेठ प्रकाश खडके, जेठानी ज्योती, दीर विलास खडके (सर्व रा. जामनेर जि. जळगाव) या पाच जणांविरुद्ध कलम ४९८,३२३,५0४,५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ आत्माराम धांडे करीत आहे.