४३ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
By Admin | Updated: March 3, 2015 01:32 IST2015-03-03T01:32:43+5:302015-03-03T01:32:43+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यात १४५ परीक्षा केंद्र.

४३ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
बुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या इयत्ता दहावीची परीक्षा आज ३ मार्चपासून सुरू होणार असून, जिल्ह्यात १४५ परीक्षा केंद्रांवरून नियमित ४0 हजार २७0 व ३ हजार २७२ पुनर्पीक्षार्थी असे मिळून एकूण ४३ हजार ५१२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळ व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. दहावीच्या लेखी परीक्षेला ३ मार्चपासून प्रारंभ होऊन २६ मार्चपर्यंत चालणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. केंद्रप्रमुख आणि परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकसभा आयोजित करून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळता यावा यासाठी जिल्ह्यातील १४५ परीक्षा केंद्रांवर १ पथक प्रमुख आणि तीन सदस्य असलेले १४५ बैठे पथक तयार करण्यात आले असून, या पथकात ५८0 कर्मचारी कार्यरत राहणार आहे. शिवाय परीक्षा केंद्रावर कुठलाही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित शिक्षक व कर्मचार्यांवर कार्यवाही केली जाणार आहे. असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गंगाधर जाधव यांनी केले आहे.