जिल्ह्यात ४ पॉझिटिव्ह, ५ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST2021-07-23T04:21:29+5:302021-07-23T04:21:29+5:30
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या ८४२ अहवालांपैकी ८३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये चिखली शहरातील एक, चिखली तालुक्यातील ...

जिल्ह्यात ४ पॉझिटिव्ह, ५ जणांची कोरोनावर मात
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या ८४२ अहवालांपैकी ८३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये चिखली शहरातील एक, चिखली तालुक्यातील खोर येथील एक, मोताळा तालुक्यातील वाघजाळ येतील एक तर बुलडाणा तालुक्यातील दहीत येथील एकाचा समावेश आहे. प्रामुख्याने बुलडाणा, चिखली आणि मोताळा हे तालुके वगळले तर अन्य दहा तालुक्यात संदिग्धांचे तपासणीत एकही जण कोरोना बाधित आढळून आलेला नाही. गुरूवारी ५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. संदिग्धांच्या करण्यात आलेल्या तपासणीमध्ये आजपर्यंत ६ लाख २४ हजार १३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर एकूण बाधितांपैकी ८६ हजार ५३९ जणांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.
--८९५ अहवालांची प्रतीक्षा--
कोरोना संदिग्धांचे घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ८९५ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८७ हजार २२७ झाली आहे. यापैकी १९ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील ६६९ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याच माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.