शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

येनगाव येथे ३५ घरांना भीषण आग

By admin | Updated: April 12, 2017 00:41 IST

जळगाव जामोद : तालुक्यात ग्राम येनगाव येथे ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग भीषण स्वरूपाची होती.

जीवितहानी टळली; घरगुती लाखोंचे साहित्य जळून खाक

जळगाव जामोद : तालुक्यात ग्राम येनगाव येथे ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग भीषण स्वरूपाची होती. भरदुपारी उन्हाच्यावेळी लागलेल्या या आगीत तब्बल ३५ घरे जळाली असून, ही सर्व कुटुंबे उघड्यावर आली आहेत. आगीत घरगुती सामान जळाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.येनगाव हे वडशिंगीपासून २ कि.मी. दक्षिणेस खेडेगाव असून, गावात झोपड्यांच्या घरात राहणारी कुटुंबे आहेत. अशा वेळी स्वयंपाक झाल्यानंतर कुणाच्या तरी चुलीमध्ये विस्तव राहिला व हवेने आग लागल्याचे बोलल्या जात आहे. ही आग दुपारी १२ वाजताच्या सुमारास लागली. यावेळी गावकरी तथा मडाखेड खुर्दवासी धावून आले. मडाखेड येथे आग विजविण्यासाठी टँकर बोलावण्यात आले; परंतु आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येताच जळगाव नगर परिषदेची अग्निशमन गाडी बोलावण्यात आली. तसेच प्रसेनजित पाटील हे तत्काळ हजर होऊन त्यांनीही यंत्रणांना फोन करून बोलावले. जळगावचे ठाणेदार साळुंके, पोकाँ विश्वनाथ जाधवसह पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांनी घटनास्थळी येऊन आग विजविण्यास मदत केली. दुपारी २ वा. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.आगीची माहिती मिळताच जळगाव जामोद तहसीलकडून मंडळ अधिकारी एच.उकर्डे, तलाठी एस.पी. श्रीनाथ यांनी घटनास्थळी जावून प्राथमिक पाहणी केली, तर या कुटुंबियांच्या जळालेल्या घरांचा पंचनामा १२ एप्रिल रोजी करणार असल्याचे सांगितले. उघड्यावर आलेल्या कुटुंबियांची जेवणाची व्यवस्था गावकऱ्यांनी केली, तर त्यांना अन्नधान्य व चहाची व्यवस्था तहसीलकडून देण्याची माहिती दिली. आग लागली त्या दरम्यान येनगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, जि.प.चे बांधकाम सभापती राजेंद्र उमाळे यांनीही भेट देऊन पाहणी केली. या कुटुंबांना पोचली आगीची झळया आगीमध्ये ३५ घरांचे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. त्यामध्ये रामहरी भारसाकळे, प्रदीप वाघ, एकनाथ वानखडे, आनंद वानखडे, संतोष दामोधर, बाबूराव सिरसाट, भगवान जवंजाळ, रवींद्र सिरसाट, राजेश जवंजाळ, ज्ञानशिल दाभाडे, श्रावण जवंजाळ, अरूण दाभाडे, मरी दाभाडे, मंगेश दाभाडे, विनायक जवंजाळ, दादाराव भारसाकळे, नीलेश दाभाडे, पांडुरंग भारसाकळे, विनोद भारसाकळे, शिवहरी भारसाकळे, शेषराव सिरसाट, प्रमोद सिरसाट, भरत इंगळे, समाधान इंगळे, नागोराव दाभाडे, जितेंद्र सिरसाट, अशोक दाभाडे, सुगदेव वानखडे, वासुदेव दाभाडे, धर्मकुमार सुरळकार, गंगाराम सिरसाट, सुनंदा दाभाडे, देवमन दाभाडे, रवींद्र दाभाडे, सोनाबाई दाभाडे यांचा समावेश आहे.लाखोंचे घरगुती साहित्य, अन्नधान्य जळालेया आगीमुळे घरांसह आजूबाजूच्या परिसरातील पराट्या, कुटार, गोठ्यांनीही पेट घेतला. त्यात ३५ घरांना चांगलीच झळ पोचली. या ३५ घरातील अन्नधान्य, कपडेलत्ते, गृहपयोगी भांडी, अंथरूण, पांघरूण यासह सर्व साहित्य जळून बेचिराख झाले. त्यामुळे हे सर्व ३५ कुटुंब उघड्यावर आली आहेत.