गोडाऊनचे शटर तोडून ३२ पोते तंबाखू लंपास
By ब्रह्मानंद जाधव | Updated: March 16, 2023 17:33 IST2023-03-16T17:33:18+5:302023-03-16T17:33:35+5:30
Crime: गोडाऊनचे लोखंडी शटरचे कोंडे तोडून ३२ पोते तंबाखू अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरूवारी गुन्हा दाखल केला आहे.

गोडाऊनचे शटर तोडून ३२ पोते तंबाखू लंपास
- ब्रह्मानंद जाधव
देऊळगाव राजा : गोडाऊनचे लोखंडी शटरचे कोंडे तोडून ३२ पोते तंबाखू अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरूवारी गुन्हा दाखल केला आहे.
जालना मार्गावरील रामदेव एजन्सीचे गोडाऊनच्या लोखंडी शटरचे कोंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. गोडाऊनमध्ये ठेवलेले ३२ पोते तंबाखू असा एकूण २ लाख १४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीचा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर गोविंद रमेशचंद्र सराफ (वय ३९, रा. देऊळगाव राजा) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे हे तपास करीत आहे.