शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव राजा उपविभागात ३० कोटी रुपयांचे वीजबिल थकीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क देऊळगाव राजा : डिसेंबर २०२०मध्ये महाराष्ट्रात सुमारे ६३ हजार कोटी रुपयांची वीजग्राहकांकडे थकबाकी असून, सदरची थकबाकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

देऊळगाव राजा : डिसेंबर २०२०मध्ये महाराष्ट्रात सुमारे ६३ हजार कोटी रुपयांची वीजग्राहकांकडे थकबाकी असून, सदरची थकबाकी न दिल्यास वीज खंडित करण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नुकतीच केली आहे. असे असले तरी देऊळगाव राजा उपविभागात वीज वितरण कंपनीचे चक्क ग्राहकांकडे तीस कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

वीज वितरण कंपनीचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता योगेश बढीये यांनी दिलेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा उपविभागामध्ये एकूण ३६ हजार ग्राहक आहेत. यामध्ये कृषिपंपधारक १६ हजार ग्राहक आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ग्राहकांची संख्या ४०० असून, घरगुती वीजग्राहक १६,५००, तर वाणिज्य ग्राहकांची संख्या दोन हजारांवर आहे. यामध्ये शासकीय-निमशासकीय कार्यालयांची संख्या १४५ असून, यांच्याकडे सुमारे दोन कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. थकबाकीदारांमध्ये देऊळगाव राजा शहरातील पोलीस स्टेशन दोन लाख रुपये, ग्रामीण रुग्णालय दीड लाख रुपये, नगर परिषदेकडे पथदिवे पाच लाख, पाणीपुरवठा चार लाख रुपये, खडकपूर्णा धरणावरील पंप हाउसचे ११ लाख रुपये थकीत असून, लॉकडाऊन काळामध्ये महावितरण कंपनीला वसुलीदरम्यान शासकीय कार्यालयांकडून कुठल्याही प्रकारे सकारात्मक सहकार्य तसेच थकबाकीपोटी रक्कम मिळाली नसल्याचे वीज वितरण कंपनीचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता यांनी सांगितले. याच बरोबर ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींतर्गत पाणीपुरवठा यांच्याकडे एक कोटी रुपये, तर पथदिवे ४५ लाख रुपये एवढी थकबाकी आहे.

चौकट...

वीज वितरण कंपनीचा अल्टिमेटम

अशी परिस्थिती असली तरी कोरोनाकाळामध्ये सर्वसामान्य व्यक्तींचे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे उद्योग धंदे बंद असल्यात जमा होते. अशावेळी सर्वसामान्य वीजग्राहकांची वीजबिलामध्ये काही सूट मिळेल काय, अशी अपेक्षा असून, शेतकरीवर्ग, मजूर यांना शासनाकडून अपेक्षा आहेत. वीज वितरण कंपनीने टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्याचा अल्टिमेटम डिसेंबरपर्यंतच होता. यानंतर वीजग्राहकांनी बिल न भरल्यास त्यांचे कनेक्शन तोडण्यात येईल, असा फतवा शासन दरबारी निघाल्याने सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत.