खामगाव शहरातील नगर पालिकेच्या १४ शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 16:01 IST2020-03-17T16:01:21+5:302020-03-17T16:01:30+5:30
खामगाव शहरात नगर पालिकेच्या विविध माध्यमांच्या १४ शाळा आहेत.

खामगाव शहरातील नगर पालिकेच्या १४ शाळा बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील नगर पालिकेच्या १४ शाळां सोमवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. सर्वच १४ शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हजर झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांविना शाळा भरल्या. गर्दी टाळण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा बंद ठेवण्यासंदर्भात एक आदेश पारीत करून ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
खामगाव शहरात नगर पालिकेच्या विविध माध्यमांच्या १४ शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना ३१ मार्च पर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नगर पालिका क्षेत्रातील सर्वच शाळांमध्ये सोमवारी विद्यार्थी दिसून आले नाही. त्याचवेळी शहरातील शाळा क्रमांक ६ सह पालिकेच्या सर्वच शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.
त्यानुसार कार्यवाही करून अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला.
(प्रतिनिधी)