शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

बुलडाणा जिल्ह्यातील २७९ स्कुल बसेसचे परवाने रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:54 IST

२७९ बसेस फेर तपासणीसाठी न आल्याने त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सुरक्षित प्रवासाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील स्कूल बसेसची फेरतपासणी करण्यासाठी आरटीओ कार्यालयात दाखल झालेल्या १६९ स्कूल बसेसची तपासणी करण्यात आली, तर २७९ बसेस फेर तपासणीसाठी न आल्याने त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. ज्या स्कूल बसेसचा परवाना रद्द केला आहे, त्या संबंधीत संस्थांना नोटीस पाठविण्यात आली असून त्यांच्यावरही आरटीओची नजर राहणार आहे.नवीन शैक्षणिक सत्रामध्ये स्कुल बसकडे आरटीओने लक्ष केंद्रीत केले आहे. स्कुल बस म्हणून नोंदणी झालेल्या वाहनांना कार्यालयात फेरतपासणी करीता बोलावून त्या स्कुल बस नियमावली २०११ नुसार सुरक्षाविषयक तरतूदीचे काटेकारपणे पालन करतात किंवा कसे याबाबत तपासणी करणे आवश्यक असते. त्यासाठी स्कूल बस मालकांनी स्कूलबस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात किंवा शिबिरात प्रपत्र अ नुसार ३१ मे २०१९ पूर्वी हजर करुन स्कूल बसेसची फेर तपासणी करुन घ्यावी आणि तसा अहवाल प्राप्त करून घ्यावा, अशा सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिल्या होत्या. जिल्ह्यात ४४८ स्कूल बसेस आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्कूल बसेसची तपासणी करण्याची मागणी पालकांनी केली होती. स्कूल बसची फेर तपासणी न केल्यास वाहनाचा परवाना निलंबन केला जाईल, असा इशाराही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिला होता. त्यानुसार निर्धारित मुदतीत केवळ १६९ स्कूल बस फेरतपासणीसाठी दाखल झाल्या. त्यानुसार फेरतपासणीसाठी न आणलेल्या २७९ स्कूलबसेसचा परवाना रद्द करण्यात आला आहे. परिवहन विभागाव्दारे स्कुल बसेसची तपासणी करून स्कूल बसेसचा परवाना निलंबित करण्यात आला आहे, अशा स्कुल बसेसव्दारे अथवा इतर बस मधून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येऊ नये, असे निर्देश उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिले आहेत.स्कुल बसवर आरटीओची नजरनवीन शालेय शैक्षणिक सत्र सुरु होत असुन स्कुल बस नियमावली २०११ अन्वये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बसव्दारे करणे बंधनकारक आहे. विद्यार्थी वाहतुक ही स्कूल बसव्दारेच व्हावी. तसेच इतर कुठल्याही वाहनांव्दारे विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही. याची जबाबदारी शालेय परिवहन समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापकांची आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास सदरबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, वाहन मालक व शिक्षण विभाग यांची राहील, असे निर्देश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दुतोंडे यांनी दिले आहे.परवाना रद्द झालेले वाहन रस्त्यावर आढळल्यास कारवाई४फेरतपासणी न झालेल्या २७९ बसेसचा परवाना निलंबीत झाल्याच्या नोटसी नोटीस संबंधित स्कूलबसचे मालक आणि संस्थांना पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, यानंतरही फेर तपासणी न केलेले वाहन रस्त्यावर आढळल्यास जप्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

स्कूल बसेसची फेरतपासणी करण्यासाठी निर्धारित मुदतीत आरटीओ कार्यालयात दाखल न झालेल्या स्कूल बसेसचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे. जिल्ह्यातील २७८ स्कूल बसेसचा परवाना रद्द केल्याच्या नोटीस संबंधित संस्थांना पाठविण्यात आल्या आहेत. परवाना निलंबीत झालेल्या बसेस रस्त्यावर वाहतूक करताना आढळल्या त्या जप्त करून कारवई केल्या जाईल.- जयश्री दुतोंडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाRto officeआरटीओ ऑफीस