दीड महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात २५ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:06 PM2019-11-16T13:06:37+5:302019-11-16T13:06:48+5:30

गेल्या दीड महिन्यात फक्त ११ दिवसात २१८ टक्के परतीचा पाऊस पडल्याने खरीपाचे हातातोंडाशी आलेले शेतकºयांचे पिक खराब झाले.

25 farmers commit suicide in Buldana district in one and a half month | दीड महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात २५ शेतकरी आत्महत्या

दीड महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात २५ शेतकरी आत्महत्या

Next

बुलडाणा: परतीच्या व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून गेल्या दीड महिन्यात २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून संपलेल्या २४ तासात आणखी दोन शेतकºयांनी आपले जीवन संपवले. दरम्यान, शेतकºयांना त्वरेने मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेनाही आता आक्रमक झाली असून तत्काळ मदत न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात फक्त ११ दिवसात २१८ टक्के परतीचा पाऊस पडल्याने खरीपाचे हातातोंडाशी आलेले शेतकºयांचे पिक खराब झाले. त्यामुळे बुलडाणा जिल्हत सहा लाख ८० हजार ६०३ हेक्टरवरील पिकांना फटका बसून तब्बल ४७८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सहजासहजी हे नुकसान भरून निघणारे नाही. नुकसानाची व्याप्ती पाहून लोणार तालुक्यातील कारेगाव येथील शेतकरी महिला सोयाबीनच्या सुडीजवळच कोसळली होती. शेवटी या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. यावरून यंदा परतीच्या पावसाने नुकसानाचा कोणता कळस गाठला हे अधोरेखीत होते.
नाही म्हणायला जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून अवर्षणसदृश्य स्थिती होती. यंदा काय तो २०१३ नंतर चांगला पाऊस पडला. मात्र हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात या पावसाने कहर केल्याने शेतकरी हवाल दिली झाला. वार्षिक सरासरीच्या तब्बल २२ टक्के पाऊस हा परतीचा पाऊस पडला आहे. त्यावरून नुकसानाची गंभीरताही स्पष्ट होते. या स्थितीमुळे शेतकºयांचे अर्थचक्रही बिघडले असून आता खरीपासाठी शेतकºयांना पुन्हा आर्थिक तजवीज करावी लागणार आहे. एक आॅक्टोबर पासून जिल्ह्यात रब्बीसाठी पीक कर्जाचे वाटप सुरू झाले आहे. आतापर्यंत सुमारे १६ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. जवळपास एकहजार ५०० शेतकºयांना त्याचा लाभ झाला असला तरी अन्य शेतकºयांना या पीक कर्जाची अद्यापही प्रतीक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची त्वरित मदत शेतकºयांना मिळावी, अशी मागणी होत आहे. दुसरीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शेतकºयांना प्रत्यक्ष मदत कधी मिळले असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीत राजकीय खेळामध्येच सध्या सर्व पक्षांचे लक्ष केंद्रीत झाल्याने शेतकºयाला मदत मिळण्यात अडचण जात आहे.
एकंदरीत दीड महिन्यात जिल्ह्यात २३ शेतकºयांनी निसर्गाचा झालेला कोप पाहता आपले जीवन संपवले असून गेल्या २४ तासात त्यात आणखी दोन शेतकºयांची भर पडून हा आकडा आता २५ वर पोहोचला आहे. पैकी प्रत्यक्षात तीन शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत मिळाली असून २२ मृत शेतकºयांचे कुटुंबिय अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

१८ वर्षात २,९२२ आत्महत्या; मदत साडेतेरा कोटींची
जिल्ह्यात २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद घेण्यात येत असून मृत शेतकºयांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही देण्यात येत आहे. आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार ९२२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. पैकी प्रत्यक्षात एक हजार ३४९ मृत शेतकºयांच्या कुटुंबियांनाच मदत मिळाली असून त्याचा आकडा हा १३ कोटी ४९ लाखांच्या घरात जातो तर संपत आलेल्या चालू वर्षात आतापर्यंत २३२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असून पैकी ७६ प्रकरणात मृत शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे.

२४ तासात दोन आत्महत्या
धाड/खामगाव: गेल्या २४ तासात जिल्ह्यात दोन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. बुलडाणा तालुक्यातील धाड नजीक असलेल्या टाकळी येथे ५५ वर्षीय शेतकरी पंडीतराव राजाराम शिंब्रे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. १४ नोव्हेंबरलाच ते घारतून कोणाला काही न सांगता निघून गेले होते. दरम्यान त्यांचे भाऊ दादाराव शिंब्रे यांच्या मक्याच्या शेतात त्यांचा मृतदेह शुक्रवारी आढळला. कर्जबाजारीपणा आणि शेतीचे नुकसान झाल्याने गेल्या काही दिवसापासून ते विवंचनेत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, बहिण असा आप्त परिवार आहे. दरम्यान, खामगाव तालुक्यातील बोरीआडगाव येथे ही १४ नोव्हेंबर रोजी गणेश विठ्ठल मेतकर (५०) या शेतकºयाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते.

Web Title: 25 farmers commit suicide in Buldana district in one and a half month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.