हिमाचल प्रदेशात अडकले जवाहर नवोदय विद्यालयाचे २१ विद्यार्थी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:43 PM2020-03-28T18:43:21+5:302020-03-28T18:43:39+5:30

हे सर्व विद्यार्थी हे शेगाव तालुक्यात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

21students of Jawahar Navodaya Vidyalaya school trapped in Himachal Pradesh | हिमाचल प्रदेशात अडकले जवाहर नवोदय विद्यालयाचे २१ विद्यार्थी 

हिमाचल प्रदेशात अडकले जवाहर नवोदय विद्यालयाचे २१ विद्यार्थी 

googlenewsNext

- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील २१ विद्यार्थी आणि ३ शिक्षक हिमाचल प्रदेश मधील चेंबा या शहरात अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना अद्याप सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहे. हे सर्व विद्यार्थी हे शेगाव तालुक्यात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
    बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चिंचोली गावात असलेल्या एकमेव जवाहर नवोदय विद्यालयातील नवव्या वर्गात शिकणाºया २१ विद्यार्थी हिमाचल प्रदेश राज्यातील चेंबा येथे असलेल्या जवाहर नवोदय नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी गेले होते.  ३१ मार्च रोजी त्यांचा शैक्षणिक कार्यकाळ संपणार होता. मात्र त्यापूर्वीच देशभरात लॉकडाऊन ची स्थिती निर्माण झाल्याने तेथील विद्यालयातील सर्व विद्यार्थी आपल्या घरी पाठविले गेले मात्र बुलढाणा जिल्ह्यातील २१ विद्यार्थ्यांना येथील प्रशासनाने परत पाठवले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सध्या तेथे अडकून पडले आहेत तर हिमाचल प्रदेश येथीलच राजकोट येथील नवोदय विद्यालयातील ८ विद्यार्थी बुलढाणा जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात शिकत असल्याने त्यांना येथील विद्यालय प्रशासनाने राजकोट येथे सोडून दिले. मात्र सोबत गेलेले तीन शिक्षकही तेथेच अडकले आहे. सध्या शिक्षक आणि विद्यार्थी सुखरूप आहेत. मात्र त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहे. या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरु झाले असलायची माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र कसरे यांनी दिली. हिमाचल प्रदेशात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना घरी परत आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.

Web Title: 21students of Jawahar Navodaya Vidyalaya school trapped in Himachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.