17.50 lakh cash seized in Khamgaon | खामगावात १७.५० लाखांची रोकड जप्त

खामगावात १७.५० लाखांची रोकड जप्त


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कारमधून साडेसतरा लक्ष रुपयांची संदिग्ध रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघांना गुरुवारी रात्री पकडण्यात आले. त्यांच्याकडून साडेसतरा लक्ष रुपयांची रोकड जप्त करण्यात आली, तसेच दोघांविरोधात शहर पोलिसांनी कारवाई केली.
केलानगरातील मनोज मधुसूदन अग्रवाल (५०) आणि नांदुरा रोडवरील विजय राठी (५५) हे दोघे एमएच-‌२८ बीके-९९९० या कारमधून १७.५० लक्ष रुपयांची रक्कम घेऊन येत होते. याबाबत गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या पथकाने अकोला बायपास येथे सापळा रचून कारची झाडाझडती घेतली. त्यावेळी कारमध्ये संदिग्ध रक्कम आढळली. रकमेबाबत योग्य तो खुलासा न केल्यामुळे  शहर पोलिसांनी मनोज अग्रवाल आणि विजय राठी यांच्याविरुद्ध १०२ सीआरपीसीनुसार कारवाई केली. या कारवाईमुळे वाहनातून हवालाची रक्कम आणणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: 17.50 lakh cash seized in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.