नांदुरा शहरातून १७ गाढवांची चोरी, अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

By विवेक चांदुरकर | Updated: December 28, 2023 14:02 IST2023-12-28T14:01:31+5:302023-12-28T14:02:14+5:30

शहरातील १७ गाढव अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २१ डिसेंबरच्या रात्री घडली. याप्रकरणी गाढवांच्या मालकांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसात २८ डिसेंबर रोजी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

17 donkeys stolen from Nandura town, | नांदुरा शहरातून १७ गाढवांची चोरी, अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

नांदुरा शहरातून १७ गाढवांची चोरी, अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

नांदुरा : शहरातील १७ गाढव अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २१ डिसेंबरच्या रात्री घडली. याप्रकरणी गाढवांच्या मालकांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसात २८ डिसेंबर रोजी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नांदुरा खुर्द येथील रहिवासी अब्दुल रहीम अ. सत्तार (वय ५९) यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांच्या मालकीचे चार गाढव तसेच गावातील इतर लोकांचे १३ गाढव अज्ञात चोरट्यांनी नांदुरा शहरातून चोरून नेले. गाढवांची किंमत ८५ हजार रुपये आहे. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या चोरीचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे मिलिंद जवंजाळ करीत आहेत. गाढवांची चोरी कशाकरिता करण्यात आली व कुणी केली, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

Read in English

Web Title: 17 donkeys stolen from Nandura town,