१३५५ मजुरांच्या हाताला काम
By Admin | Updated: August 5, 2014 01:22 IST2014-08-04T23:44:48+5:302014-08-05T01:22:26+5:30
मेहकर : रोजगार हमी योजनेच्या कामांना वेग

१३५५ मजुरांच्या हाताला काम
मेहकर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यामध्ये विविध कामांना वेग आला आहे. सद्यस्थितीत रोजगार हमी योजनेतून तालुक्यातील १ हजार ३५५ मजुरांच्या हाताला कामे मिळाली आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यामध्ये यंत्रणेमार्फत विविध प्रकारची एकूण १३ कामे सुरु असून सदर कामांवर एकुण साप्ताहीक ८८८ मजुर उपलब्ध आहेत. तसेच ग्रामपंचायत मार्फत एकूण ११ कामे सुरु असून सदर कामांवर साप्ताहीक ४६७ मजुर उपलब्ध आहेत. असे तालुक्यामध्ये एकूण २४ कामे सद्यस्थितीत सुरु असून सदर कामांवर एकूण १ हजार ३५५ मजुर उपस्थित आहेत. तालुक्यामध्ये विविध यंत्रणेची विविध प्रकारची एकूण १६१ कामे मजुरांना देण्यासाठी शेल्फवर ठेवण्यात आलेली आहेत. तसेच ग्रामपंचायतीची वैयक्तीक शौचालयाची एकूण ६ हजार १२४ कामासह एकूण ६ हजार १८२ विविध स्वरुपाची कामे शेल्फवर ठेवण्यात आलेली आहेत. अशा प्रकारे एकूण ६ हजार ३४३ कामांचा शेल्फ तयार करण्यात आलेला आहे. तालुक्यामध्ये सन २0१४-१५ या वित्तीय वर्षात एकूण १ लाख ४१ हजार १६८ मनुष्यदिन निर्मिती होईल, इतका शेल्फ तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी जि.प.बांधकाम मेहकर यांचे रस्ता खडीकरण ४६ कामे, उपविभागीय अधिकारी जि.प. सिंचन मेहकर यांचे गाळ काढणे ५ कामे, तालुका कृषी अधिकारी मेहकर यांचे ढाळीचे बांध ४२ व वैयक्तीक फळबाग लागवड ५0 कामे तसेच वैयक्तीक शेततळे १ काम, सहाय्यक अभियंता श्रेणी -१, पाटबंधारे मेहकर यांचे काटछेद दुरुस्ती २ कामे, लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण यांचे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड १ काम, सहाय्यक अभियंता श्रेणी - १, पेनटाकळी प्रकल्प उपविभाग क्र.३ मेहकर यांचे वृक्षलावगड ४ कामे, वनपरिक्षेत्र अधिकारी परिक्षेत्र मेहकर (रोहयो) यांचे माती नाला ५ कामे व सिमेंट नाला ३ कामे, सहाय्यक अभियंता श्रेणी -१ मनप्रकल्प उपविभाग खामगाव यांचे साफसफाई करणे २ कामे याप्रमाणे कामांचा यंत्रणानिहाय शेल्फ तयार करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यामध्ये अशा प्रकारचे विविध कामे निर्माण करण्यात येत असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.