शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

बुलडाणा जिल्ह्यातील १.२६ लाख शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 11:22 IST

Crop loan : १३ हजार ७३१ शेतकऱ्यांना १८ मे पर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आले असून १ लाख २६ हजार २६९ शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत़.

- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले हाेते़ त्यामुळे बॅंकांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले हाेते़ त्याचा परिणाम पीक कर्ज वाटपावरही झाला आहे़ खरीप हंगामास सुरूवात हाेण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना ९० टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे़.  जिल्ह्यातील १३ हजार ७३१ शेतकऱ्यांना १८ मे पर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आले असून १ लाख २६ हजार २६९ शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत़.खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़ या नुकसानातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली़ रब्बीतही शेतकऱ्यांना फारसे उत्पादन झाले नाही़ अनेक शेतकऱ्यांना कडक निर्बंधामुळे शेत मालाची विक्री करता आली नाही़ त्यामुळे, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा माेठा आधार असताे़ मात्र,मार्च महिन्यापासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने निर्बंध लागू केले हाेते़ दहा दिवस बॅंकाही बंद ठेवण्यात आल्याने पीक कर्ज वाटप रखडले आहे़ गत वर्षी एक लाख ५३ हजार ३४० शेतकऱ्यांना १हजार २५५ काेटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले़ गत वर्षीपासून लक्ष्यांकाच्या अर्धेही कर्जवाटप हाेत नसल्याने तीन वर्षाआधी केलेल्या कर्जवाटपाचा आधार घेउन लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे़ यावर्षी जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० काेटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दीष्ट आहे़ मात्र, १८ मे पर्यंत बॅंकांनी १० टक्के शेतकऱ्यांना ९ टक्केच रकमेचे वितरण केले आहे़ याच गतीने कर्ज वाटप झाल्यानंतर खरीप हंगामाच्या मध्यापर्यंत ही प्रक्रीया सुरू राहण्याची भिती आहे़ राष्टीय कृत बॅंकामधून पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे चित्र आहे. 

खरीप हंगाम काही दिवसांवर आला असल्याने सर्वच बॅंकांना पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ १८ मे पर्यंत १३ हजार ७३१ शेतकऱ्यांना ११६ काेटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे़ येत्या काही दिवसात पीक कर्ज वाटपाची गती वाढवण्यात येणार आहे़-नरेश हेडाऊ, व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, बुलडाणा

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbuldhanaबुलडाणाFarmerशेतकरी