शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सावकारांकडून बुलडाणा जिल्ह्यात १२.३० कोटींचे कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 11:46 AM

Buldhana News १२२ परवानाधारक सावकारांनी १२ कोटी ३० लाख १४ हजार ९१९ रुपयांचे कर्जवाटप केल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे १४ हजार २६१ नागरिकांना हा कर्जपुरवठा या सावकारांनी केला आहे.११ कोटी ८४ लाख ४६ हजार ६१९ रुपयांचे कर्ज हे तारणावर दिल्या गेले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :    जिल्ह्यात कृषक व अकृषक क्षेत्रात १२२ परवानाधारक सावकारांनी १२ कोटी ३० लाख १४ हजार ९१९ रुपयांचे कर्जवाटप केल्याची माहिती समोर आली आहे.जिल्ह्यातील १४ हजार २६१ नागरिकांना हा कर्जपुरवठा या सावकारांनी केला आहे. यात प्राुख्याने ३६ शेतकऱ्यांना ५ लाख ६६ हजार रुपयांचे कृषी कर्ज, तर उर्वरित कर्ज हे बिगर कृषी क्षेत्रात देण्यात आले आहे. त्याचा आकडा १२ कोटी २४ लाख ४८ हजार ९१९ रुपये आहे. १४ हजार २२५ जणांनी ते घेतेल आहे. विशेष म्हणजे यापैकी ११ कोटी ८४ लाख ४६ हजार ६१९ रुपयांचे कर्ज हे तारणावर दिल्या गेले आहे, तर २१८ जणांना ४५ लाख ६८ हजार ३०० रुपयांचे कर्ज हे बिगर तारण दिल्या गेले आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी ५५ शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यात आले असून, सावकाराच्या ताब्यात असलेली ५९ हेक्टर जमीन ही शेतकऱ्यांना परत करण्यात आली होती. अवैध सावकारीच्या जिल्ह्यात   ५९६ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ५११ तक्रारीमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे. यापैकी अवैध सावकारी झाल्याचे ७५ प्रकरणांत सिद्ध झाले असून, अन्य प्रकरणांत कारवाई होतेय. 

घेतलेले कर्ज शेगाव तालुक्यात ३६ शेतकऱ्यांनी सावकारांकडून  ५ लाख ६६ हजार रुपये कर्ज घेतले आहे, तर अकृषक क्षेत्रात एकट्या शेगाव तालुक्यातल १,४४७ जणांनी एक कोटी पाच लाख ६४ हजार ५०० रुपयांचे कर्ज घेतले आहे. खामगाव तालुक्यात ९,४०० जणांनी अकृषक क्षेत्रासाठी ८ कोटी ३२ लाख ६२ हजार ८५० रुपये कर्ज घेतलेले आहे. मेहकर तालुक्यातही १ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांचे १,७१० जणांनी कर्ज घेतले आहे. 

अनधिकृत सावकारी अवैध सावकारीच्या जिल्ह्यात नवा अधिनियम लागू झाल्यापासून ५९६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नोव्हेंबर २०२० नंतर २७ तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. यापैकी जवळपास ४८ प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी अअधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास वर्षाला ९ टक्के, बिगरतारणसाठी १२ टक्के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ टक्के आणि बिगर कृषी बिगर तारणसाठी १८टक्के व्याजदर आकारला जातो. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी