12 killed, 858 positive in Buldana district | बुलडाणा  जिल्ह्यात १२ जणांचा मृत्यू, ८५८ जण पॉझिटिव्ह

बुलडाणा  जिल्ह्यात १२ जणांचा मृत्यू, ८५८ जण पॉझिटिव्ह


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून ८५८ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. एकाच दिवशी कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू होण्याची ही जिल्ह्यातील पहिली घटना आहे. त्यामुळे बुधवाराचा कोरोना मृत्यूदर हा १.३९ टक्के होता.
दरम्यान मृत्यू झालेल्यामंध्ये खामगाव तालुक्यातील शिरसगाव येथील ६८ वर्षीय व्यक्ती, खामगावातील केशवनगरमधील ४५ वर्षीय व्यक्ती, खामगावातीलच ४५ वर्षीय महिला, रोहणा येथील ६५ वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातीलच सारोळा येथील ६२ वर्षीय व्यक्ती, समन्वयनगरमधील मधील ३५ वर्षीय व्यक्ती, सती फैलातील ७१ वर्षीय पुरुष, शेगावातील आरोग्य कॉलनीमधील ५२ वर्षीय महिला, मेहकर तालुक्यातील वर्दडी येथील ५५ वर्षीय महिला, बुलडाण्यातील ४६ वर्षीय पुरुष चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील ६० वर्षीय पुरुष आणि चिखली तालुक्यातील अमडापूर येथील ६१ वर्षीय महिलेचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
बुधवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्ट किटद्वारे तपासण्यात आलेल्या ५ हजार ३८६ अहवालांपैकी ४ हजार ५२८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ८५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४१५ व रॅपीड टेस्टमधील ४४३ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ९९१ तर रॅपिड टेस्टमधील ३,५३७ अहवालांचा समावेश आहे.
दुसरीकडे पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ९०, खामगाव तालुक्यातील ७४, शेगाव २०, देऊळगाव राजा १११, चिखली ९६, मेहकर ५२, मलकापूर ३८, नांदुरा ८०, लोणार ७३, मोताळा तालुक्यातील ३३, जळगाव जामोदमधील ४८, सिंदखेड राजातील १३९, संग्रामपूरमधील चार जणांचा यात समावेश आहे.
दुसरीकडे बुधवारी ५२८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सोबतच आजपर्यंत तपासण्यात आलेल्यांमध्ये ३ लाख १३ हजार २०१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ५४ हजार ८२१ झाली असून त्यापैकी ४७ हजार १४२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान बुलडाण्याचा काेराेना मृत्यूदर हा १ टक्केच्या खाली आहे. आतापर्यंत  आरटीपीसीआरच्या एक लाख ७९ हजार ६६७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. रॅपीड टेस्टची संख्या १ लाख ९० हजार ९७१ झाली आहे. तर ट्रनॅटव्दारे १२ हजार ४०९ जणांच्या तपासणी करण्यात आल्या आहेत. 

Web Title: 12 killed, 858 positive in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.