११ हजार शेतक-यांचे साडेनऊ कोटी अनुदान रखडले!

By Admin | Updated: June 21, 2016 23:27 IST2016-06-21T23:27:00+5:302016-06-21T23:27:00+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील ११ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित; ३९ हजार शेतक-याना मदतीचे वाटप.

11 thousand grants for 11 thousand farmers have come! | ११ हजार शेतक-यांचे साडेनऊ कोटी अनुदान रखडले!

११ हजार शेतक-यांचे साडेनऊ कोटी अनुदान रखडले!

काशिनाथ मेहेत्रे / सिंदखेडराजा (जि. बुलडाणा)
सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकर्‍यांना २५ जानेवारी २0१६ पासून अनुदानाचे वाटप करण्यात येत आहे. ३१ मार्च १६ पर्यंंत ३९0४७ शेतकर्‍यांना २५ कोटी ६३ लाख ६९ हजार ७९६ रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले; परंतु आजपर्यंत शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे ११२९५ शेतकर्‍यांचे ९ कोटी ३५ लाख ९८ हजार ८0४ रुपये अनुदान रखडले आहे.
सन २0१५ ला खरिपाचे पीक हातचे गेल्यामुळे तालुक्यातील ५0३४२ शेतकर्‍यांचे ५२६७0 हेक्टरवरील पीक वाया गेल्यामुळे त्यांना ३५ कोटी ८१ लाख ५७ हजार ३६0 रुपयांची मदत शासनाने देण्याची घोषणा केली. त्यापैकी ११२९५ शेतकर्‍यांचे ९ कोटी ३५ लाख ९८ हजार ८0४ रुपये अनुदान रखडले ते अनुदान त्यांना पेरणीसाठी मिळावे, अशी मागणी शिवसेनेचे अनिल मेहेत्रे यांनी तहसीलदारांकडे १९ जून रोजी केली आहे.
ज्या शेतकर्‍यांचे बँकेतील खाते नंबर तलाठय़ाकडे प्राप्त झाले, अशा ६४४६ शेतकर्‍यांना अनुदान देण्यासाठी २३ मे २0१६ रोजी ९ कोटी ३५ लाख ९८ हजार ८0४ रुपये अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली. शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला असून, पेरणी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही, त्यामुळे काळ्या आईची ओटी भरण्यासाठी माय माउल्यांच्या अंगावरील मंगळसूत्र, दागदागिने विकून बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करताना शेतकरी दिसत आहे. शासनाने बळीराजाला मदत देण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी अनिल मेहेत्रे, कैलास मेहेत्रे यांनी केली आहे.

Web Title: 11 thousand grants for 11 thousand farmers have come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.