११ रिंगणात, ५ उमेदवारांची माघार

By Admin | Updated: October 1, 2014 23:50 IST2014-10-01T23:50:49+5:302014-10-01T23:50:49+5:30

खामगाव विधानसभा मतदारसंघातून ५ उमेदवारांची माघार; ११ उमेदवार रिंगणात.

11 candidates, 5 candidates withdrawn | ११ रिंगणात, ५ उमेदवारांची माघार

११ रिंगणात, ५ उमेदवारांची माघार

खामगाव :खामगाव मध्ये आज ५ उमेदवारांनी अर्ज मागे घे तल्याने आता ११ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.रिंगणात असलेल्या उमेदवारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नाना कोकरे, शिवसेनेचे हरिदास हुरसाड यांचेसह प्रताप तेजराव वानखडे बहुजन मुक्ती पार्टी, शेळके संकेत अशोक अखिल भारतीय हिंदू महासभा, मो.हसन अ.खालीक मायनॉरिटीज डेमोक्रेटीक पार्टी, शेख इरफान शेख सुभान कुरेशी अपक्ष, श्याम बन्सीलाल शर्मा अ पक्ष, हाजी बुढनखां अब्बासखां अपक्ष यांचा समावेश आहे. तर अर्ज मागे घेणार्‍यांमध्ये अमोल अंधारे अपक्ष, म.बिलाल म.सत्तार अपक्ष, कैलास फाटे अपक्ष, राहुल अबगड बसपा, मोहम्मद अजहर मोहम्मद शौकत इंडियन युनियन मुस्लिम लिग या पाच जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता यांचा समावेश आहे. खामगावात काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा व अँड.आकाश फुंडकर यांच्यामध्ये प्र ितष्ठेची लढत होत असून भारिपचे अशोक सोनोने व राष्ट्रवादीचे नाना कोकरे यांच्याही उमेदवारी मुळे चौरंगी लढत होऊ घातली आहे.

Web Title: 11 candidates, 5 candidates withdrawn