बुलडाण्यात शिवशाही बस उलटली; दहा प्रवासी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:59 IST2018-04-15T22:59:46+5:302018-04-15T22:59:46+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू

बुलडाण्यात शिवशाही बस उलटली; दहा प्रवासी गंभीर जखमी
उंद्री (बुलडाणा): अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार आगाराची शिवशाही बस उलटल्यानं १0 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज (रविवारी) संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान चिखली तालुक्यातील उंद्री या गावाजवळ बसला अपघात झाला. अपघातातील जखमींवर उंद्री येथील प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
चांदूरबाजार आगाराची शिवशाही बस (क्र. एम. एच. 0९ - ई.एम. २५७८) औरंगाबादकडे जात होती. दरम्यान, उंद्रीनजीक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस उलटली. बसमध्ये एकूण २३ प्रवासी होते. त्यापैकी १0 प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उंद्री व वैरागड येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी जखमींना बसमधून बाहेर काढलं. उंद्री येथे प्राथमिक उपचारानंतर, सर्व जखमींना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं.
जखमींमध्ये चालक दीपक विश्वनाथ इंगळे (वय ४२), वाहक चंद्रशेखर अर्जुनराव नागदिवे (वय २९), संजय शंकर पोटे (वय ५0), तन्वी संजय पोटे (वय १५), अनुज संजय पोटे (वय १0) तिघेही रा. औरंगाबाद, भगवान प्रेमचंद पटेल (वय ५२), तेजल भगवान पटेल (वय १७) दोघेही रा. हतोडी ता. अंजनगाव, सुषमा संजय पोटे (वय ४५) रा. औरंगाबाद, सै.शहाबुद्दीन सै. हबीबद्दीन (वय ४५) रा. औरंगाबाद, सै.आयशा सै.शहाबुद्दीन (वय ४0) रा. औरंगाबाद यांचा समावेश आहे.