शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

शवविच्छेदनाचं काम करणाऱ्या मोहम्मदकडून मुख्यमंत्री सहायता निधीस १ महिन्याचा पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 12:05 IST

गरिबातील गरिबांपासून ते जगातील टॉप उद्योजकांच्या यादीत असलेल्या टाटा आणि अंबानी यांनीही पीएमओ फंडात आणि मुख्यमंत्री सहायता निधीला रक्कम देऊ केली आहे.

बुलडाणा - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे सर्वच ठप्प असल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून विविध करांच्या माध्यमातून सरकारला मिळणारा महसूल देखील बंद झाला आहे. त्यामुळे शासनाची आर्थिक बाजू कमकुवत आहे. या संकटकाळात मदतीचा हात म्हणून अनेक संस्था, व्यक्ती, उद्योजक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने मदतीचा हात पुढे करीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील एका सफाई कामगाराने आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी बँकेत जमा केले. 

गरिबातील गरिबांपासून ते जगातील टॉप उद्योजकांच्या यादीत असलेल्या टाटा आणि अंबानी यांनीही पीएमओ फंडात आणि मुख्यमंत्री सहायता निधीला रक्कम देऊ केली आहे. ही लढाई प्रत्येकाने देशाविरुद्धची लढाई म्हणून यात सहभाग नोंदवला आहे. कुणी घरी बसून, कुणी प्रत्यक्ष काम करुन, कुणी भुकेल्यांना अन्न देऊन, कुणी गरिबांना धान्य देऊन या लढाईत आपलं योगदान देत आहे. तर, राज्य सरकारला मदत करण्यासाठीही अनेकजण पुढे येत आहेत. कोरोना योद्धा बनूनही युवक पुढे सरसावले आहेत. तर, अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा करुन आपलं योगदान दिलंय. 

कुण्या चिमुकल्याने वाढदिवसाचा खर्च टाळून, कुणी सायकलसाठी साठवलेले पैसे देऊन तर कुणी लग्नाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा केली. अगदी १०० रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांपर्यंत प्रत्येकाने आपल्याला जमेल तेवढे योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. बुलडाणा येथील सफाई कामगार मोहम्मद यांनी आपल्या १ महिन्याचं वेतन तब्बल २३ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी बँकेत जमा केले. 

बुलडाणा जिल्हा माहिती विभागाने याबाबत माहिती देत, मोहम्मद यांचा आणि त्यांनी जमा केलेल्या पैशाच्या स्लीपचा फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात सफाईगार पदावर शव विच्छेदनाचे काम करणारे मोहम्मद अफसर शेख गफ्फार यांनी कोविड – 19 आजारावरील नियंत्रणाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक महिन्याचे 23 हजार रूपये वेतन आज  बँक खात्यात जमा केले, अशी माहितीही देण्यात आली आहे. आदमी पैसे से नही, दिल से बडा होना चाहिए... असंच या फोटोकडे पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल. 

मुंबई अन् पुण्यासह विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना लवकरच गावी पोहोचवणार लालपरी

कांद्याचे भाव गडगडणार, शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी

टॅग्स :buldhanaबुलडाणाChief Ministerमुख्यमंत्रीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस