चारचाकी वाहनाच्या धडकेत १ ठार

By Admin | Updated: August 18, 2014 00:17 IST2014-08-17T23:53:29+5:302014-08-18T00:17:00+5:30

महेकर तालुक्यातील चिंचोली फाटयाजवळल अपघातात एक ठार.

1 killed in Chachaike vehicle crash | चारचाकी वाहनाच्या धडकेत १ ठार

चारचाकी वाहनाच्या धडकेत १ ठार

मेहकर : भरधाव वेगात जाणार्‍या कमांडर जीपने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन जणांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चिंचोली बोरे फाट्यानजीक घडली.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, मेहकरवरुन सुलतानपूर कडे एम.एच.१२ ए.एफ. २६१ क्रमांकाची कमांडर जीप भरधाव वेगात जात होती. दरम्यान पळसखेड येथील अनिल दगडू ताकतोडे व सुरेश केरुबा ताटेकर आपली एम.एच.२८ ए.सी.७९५८ क्रमांकाची मोटारसायकल सारंगपूर रस्त्यावर एका बाजुला लावून उभे होते. अशातच कमांडर जीपने भरधाव वेगात येऊन त्यांना धडक दिली. त्यात दोघेही जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन बुलडाणा येथे हलविण्यात आले. त्यामध्ये अनिल दगडू ताकतोडे यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. यासंदर्भात नायगाव दत्तापूर येथील आनंदा ताकतोडे यांनी मेहकर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. या परिसरातील रस्त्यावर दुभाजक नसल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

Web Title: 1 killed in Chachaike vehicle crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.