"पैसा, प्रसिद्धीसाठीच ते लग्न करतात"; नोरा फतेहीचा सेलिब्रिटी जोडप्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:39 AM2024-04-12T11:39:48+5:302024-04-12T11:42:00+5:30

नोराने प्रेमाचा दिखावा करणाऱ्या सेलिब्रिटी जोडप्यांवर निशाणा साधला.

Nora Fatehi reveals celebrity couple get married only for fame money and power | "पैसा, प्रसिद्धीसाठीच ते लग्न करतात"; नोरा फतेहीचा सेलिब्रिटी जोडप्यांवर निशाणा

"पैसा, प्रसिद्धीसाठीच ते लग्न करतात"; नोरा फतेहीचा सेलिब्रिटी जोडप्यांवर निशाणा

अभिनेत्री, डान्सर नोरा फतेहीचा (Nora Fatehi) मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या नृत्यकौशल्याने चाहत्यांवर भुरळ घातली आहे. तिचं डान्स टॅलेंट अनेक रिएलिटी शोमध्ये पाहिलंच आहे. ज्याप्रकारे तिची कंबर हलते, तिचे लटके झटके पाहून प्रेक्षक तिच्यावर फिदाच होतात. नोराने हिंदी सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच ती 'मडगाव एक्सप्रेस' सिनेमात दिसली. आता तिने एका मुलाखतीतून बॉलिवूड कपल्सवर निशाणा साधला आहे. पैसा, प्रसिद्धीसाठीच ते लग्न करतात असं ती म्हणाली आहे.

रणवीर अलाहाबादियाच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नोराने प्रेमाचा दिखावा करणाऱ्या सेलिब्रिटी जोडप्यांवर निशाणा साधला. लोकांसमोर चांगलं दिसण्यासाठीच ते एकत्र असतात असा आरोप तिने केला. नोरा म्हणाली, "हे लोक दबंग शिकारी आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी ते तुमचा वापर करतात. मी त्यातली नाही म्हणूनच तुम्ही मला मुलांसोबत फिरताना किंवा डेटिंग करताना पाहिलं नाही. पण मी हे माझ्यासमोर पाहिलं आहे. फिल्म इंडस्ट्रीत लोक फक्त दिखावा म्हणून लग्न करतात. ते आपल्या पार्टनरचा वापर केवळ नेटवर्किंगसाठी आणि पैशांसाठी करतात. ते विचार करतात याच्याशी लग्न केलं तर आपण तिघांसाठी पॉवरफुल असू. त्याचे किंवा तिचे सिनेमे रिलीज होणार आहेत आणि बॉक्स ऑफिसवर चांगलं काम करत आहेत तर आपणही त्यांच्यात सामील व्हावं."

ती पुढे म्हणाली, "हे केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी केलं जातं. यासाठी हे लोक संपूर्ण आयुष्य खराब करतात. अशा व्यक्तीशी लग्न करतात ज्यांच्यावर तुम्ही प्रेमच करत नाही आणि मग वर्षानुवर्ष त्या व्यक्तीसोबत राहतात. इंडस्ट्रीत बहुतांश लोक असाच घाणेरडेपणा करत आहेत. आपल्या करिअरचं काय होईल याची त्यांना कल्पना नसते. म्हणूनच त्यांना प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी असा बॅकअप प्लॅनची गरज असते."

नोरा फतेही कॅनडात जन्माला आली असून ती मोरक्कोमध्ये राहिली आहे.  2014 साली तिने 'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2019 मध्ये आलेल्या  'बाटला हाऊस' सिनेमातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरही मिळाला. 

Web Title: Nora Fatehi reveals celebrity couple get married only for fame money and power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.