Water should be kept along with leaflets | ऑक्टोबर हीटचा तडाखा-प्रचारपत्रकांसोबतच बाळगायला हवे पाणी
ऑक्टोबर हीटचा तडाखा-प्रचारपत्रकांसोबतच बाळगायला हवे पाणी

ठळक मुद्देप्रचारपत्रकांसोबतच बाळगायला हवे पाणी१२ ते ४ या वेळेत टाळा प्रचार

हवेतील आर्द्रतेमुळे घाम खूप येतो. त्याने शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे डीहायड्रेशन (निर्जलीकरण) होते. डीहायड्रेशनमुळे उष्माघाताची शक्यता वाढते. थकवा येणे, ताप येणे, चक्कर येणे अशी उष्माघाताची लक्षणे आहेत.

उष्माघात वाढला तर शुद्धही हरपते. खरं तर दुपारी १२ ते ४ या वेळेत प्रचार टाळायला हवा. ग्रामीण भागात याचवेळेत कष्टकरी लोकांची भेट होते. त्यामुळे ही वेळ टाळता आली नाही तर त्यावेळी आपल्यासोबत पाणी ठेवावे. शरीरात पुरेसे पाणी जायला हवे. नारळपाणी किंवा फळांचा रस अशा दिवसात अधिक उपयुक्त ठरतो.

हे आवर्जून करा

1. उन्हाळा खूप असल्याने सैलसर आणि सुती कपडे वापरा.
2. शक्यतो दुपारी १२ ते ४ यावेळेत बाहेर पडणे टाळावे.
3. डोक्यावर टोपी घालावी, अन्यथा स्कार्फ गुंडाळावा.
4. पांढऱ्या रंगाचे किंवा फिकट रंगांचे कपडे वापरावेत.
5. साधे पाणी, नारळाचे पाणी किंवा फळाचा रस प्यावा.

हे आवर्जून टाळा

1. जीन्स किंवा तत्सम जाड कपडे वापरू नयेत.
2. गॅसयुक्त शीतपेये प्राशन करू नयेत, त्याने त्रास वाढतो.
3. बर्फ घातलेले तसेच फ्रीजमधील पाणी पिऊ नये.
4. उन्हातून फिरताना गडद रंगांचे कपडे वापरू नयेत.
5. पाव कमी खावा. ते शरीरातील पाणी जास्त शोषतात. 


Web Title: Water should be kept along with leaflets
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.