जॉर्जसाब...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 02:44 AM2019-01-30T02:44:18+5:302019-01-30T02:44:48+5:30

मुंबईला गिरगावातल्या बॉम्बे लेबर युनियनच्या कचेरीमध्ये दुसऱ्या मजल्यावर जॉर्ज फर्नांडिस यांची बसण्याची खोली आहे. खोलीबाहेर सतत वेगवेगळ्या पेशांचे अनेक कामगार हातात कागदपत्रे घेऊन आपल्या कुठल्यातरी गाऱ्हाण्यांची ‘जॉर्जसाब’जवळ दाद लावून घेण्यासाठी ओळीत बसलेले असतात.

George's ... | जॉर्जसाब...

जॉर्जसाब...

Next

जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव थोडेफार परिचित होत असताना प्रसिद्ध लेखक अरुण साधू यांनी ‘माणूस’ साप्ताहिकासाठी आॅक्टोबर १९६६मध्ये केलेली कव्हर स्टोरी विशेष गाजली. त्यातील काही अंश; माणूस प्रतिष्ठान आणि गोखले इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या सौजन्याने.

मुंबईला गिरगावातल्या बॉम्बे लेबर युनियनच्या कचेरीमध्ये दुसऱ्या मजल्यावर जॉर्ज फर्नांडिस यांची बसण्याची खोली आहे. खोलीबाहेर सतत वेगवेगळ्या पेशांचे अनेक कामगार हातात कागदपत्रे घेऊन आपल्या कुठल्यातरी गाऱ्हाण्यांची ‘जॉर्जसाब’जवळ दाद लावून घेण्यासाठी ओळीत बसलेले असतात. खोलीत जॉर्ज फर्नांडिस यांचा कामाचा सपाटा चालू असतो. अमुक कारखानदाराला नोटीस दे, तमक्या कंपनीतल्या कामगारांवर झालेल्या अन्यायाकडे मालकाचे लक्ष वेध अशा तºहेची पत्रे लिहिणे चालू असते. वेगवेगळ्या पत्रांवर भराभर सह्या होत असतात. एकीकडे आत येणाºयांशी बोलणे चालू असते.

उकाडा असह्य होत असतो म्हणून सहजपणे फर्नांडिससाहेब आपल्या अंगातला मॅनिला काढून खुर्चीवर लटकवून ठेवतात आणि तेवढ्याच सहजपणे पूर्ण आत्मविश्वासाने मला सांगतात -
‘‘मी स. का. पाटलांविरुद्ध नुसताच उभा राहणार नाही, तर त्यांना पाडणार आहे. त्यांचा दणदणीत पराभव करणार आहे.’’
कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचं सारं जीवनच धडाडीचं आणि दणकेबाज आहे. अवघ्या १५ वर्षांपूर्वी त्यांना मुंबईत कुणी विचारत नव्हतं. एका वेळच्या जेवणाची त्यांना फिकीर पडायची. आज मुंबईच्या जीवनाच्या बºयाच नाड्या त्यांच्या हातात आहेत. मुंबईच्या कामगारांमध्ये ‘जॉर्जसाब’ हा परवलीचा शब्द बनला आहे.

लोकसभेसाठी उभे राहण्याची ‘हौस’ नाही, असे फर्नांडिस सांगतात. ‘‘हौस असती तर दुसºया सोप्या मतदारासंघातून उभा राहिलो असतो. तसा मला अनेकांनी आग्रहही केला.’’ ते म्हणतात, ‘‘माझा मुख्य उद्देश पाटील मुंबईत पडूच शकत नाहीत, हा भ्रम दूर करण्याचा. मुंबईत निवडणूक थैलीशाहीवर, गुंडगिरीवर चालते हा गैरसमज दूर करण्याचा आणि मला खात्री आहे, मी पाटलांचा जबरदस्त पराभव करीन.’’
एवढ्या धडाडीचा हा जहाल कामगार नेता कॅथॉलिक प्रिस्ट बनणार होता, हे कुणाला ऐकूनही खरं वाटणार नाही.

जॉर्ज फर्नांडिस यांचं कुटुंबच धार्मिक होतं. मंगलोरला एका मध्यमवर्गीय रोमन कॅथॉलिक कुटुंबात १९३०च्या ३ जूनला जॉर्जचा जन्म झाला. पाच भावांपैकी जॉर्ज सगळ्यांत मोठा. त्याचे वडील विमा एजंट होते. सोळाव्या वर्षी मॅट्रिक झाल्यावर धर्मगुरू बनण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला सरळ बंगलोरच्या एका कॅथॉलिक सेमिनरीत घातलं.

दीड-दोन वर्षे जॉर्ज फर्नांडिस यांनी सेमिनरीमध्ये लॅटिन आणि फिलॉसॉफी या विषयांत चांगलीच प्रगती केली. असंच पुढे चालू राहिलं असतं, तर आज कुठल्यातरी चर्चमध्ये ते बायबलची प्रवचनं करीत राहिले असते; पण त्यांची चिकित्सक बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देणार नव्हती.

थोड्याच दिवसांत त्यांना कंटाळा आला. अभ्यासक्रमाचा नव्हे, तर सेमिनरीमधल्या धर्मगुरूंच्या ढोंगीपणाचा. सेमिनरीविषयी, सेमिनरीतल्या शिक्षणाविषयी त्यांच्या बºयाच अपेक्षा होत्या त्या अपेक्षा झाल्या नाहीत.

‘‘दुसºयाला मोक्षाच्या गप्पा सांगणाºयांनी तरी स्वत: काही गोष्टी पाळाव्यात असं वाटतं; पण प्रत्येक गोष्ट चिकित्सक बुद्धीने निकषाला घासून पाहणाºया माझ्या तरुण मनाच्या वाट्याला विफलताच आली आणि हळूहळू मी सेमिनरीच्या शिक्षणातून अंग काढून घेतलं.,’’ फर्नांडिस यांनी मला सांगितलं. शिक्षण त्यांनी अपूर्णच सोडलं असलं, तरी धर्मावरची श्रद्धा सोडली नाही.

याच सुमाराला मुंबई शहरातून हद्दपार झालेले कामगार नेते डिमेलो हे मंगलोरमध्ये आले होते. १९४९मध्ये त्यांचा आणि जॉर्ज फर्नांडिस यांचा परिचय झाला आणि त्यांच्या परिचयामुळेच ते समाजवादी चळवळीत ओढले गेले.

मंगलोर शहरातल्या मोटार कामगारांची आणि हॉटेल कामगारांची स्थिती त्या वेळी अतिशय दयनीय होती. या दोन्ही धंद्यांतील कामगारांच्या डिमेलो आणि फर्नांडिस यांनी संघटना उभारल्या. याच वेळी जॉर्ज फर्नांडिस यांना स्वत:चं क्षेत्र सापडलं. त्यांचं संघटनकौशल्य याच वेळी दिसून आलं. जुलै १९५०मध्ये डिमेलो आणि फर्नांडिस यांनी मंगलोरचा मोटर कामगारांचा संप घडवून आणला आणि त्यामध्ये त्यांना प्रचंड मार बसला. संपात मार बसला तरी फर्नांडिस यांनी मंगलोरच्या कामगारांत खूप लोकप्रियता मिळवली होती. त्यांचं वय अवघं २० वर्षाचं होतं. पुढे शिकावं, ही इच्छा होती. घरी थारा नव्हता. ते ज्या हॉटेल कामगारांमध्ये काम करीत त्यांनी पैसा-पैसा वर्गणी गोळा करून २५ रुपये जमा केले आणि कायद्याच्या शिक्षणासाठी जॉर्ज यांना मुंबईला पाठवलं.

नायर हॉस्पिटलमध्ये कामगारांची संघटना करण्यासाठी फर्नांडिस यांच्या जवळचं भांडवल म्हणजे कामगारांशी वैयक्तिक संबंध, कामगारांविषयीचा अपार जिव्हाळा, कामगारांच्या प्रश्नासाठी वाटेल ते भांडण ओढवून घेण्याची तयारी आणि कामगार नेत्यांच्या ठायी आवश्यक असणारा भांडखोरपणा. साºया कामगारांना फर्नांडिस यांच्या कामगारनिष्ठेविषयी खात्री आहे. म्हणूनच ‘जॉर्जसाब’च नाव घेतल्याबरोबर ते गहिवरतात.

‘माणूस’च्या कामासाठी मी त्यांना प्रथम भेटलो ते नायर हॉस्पिटलमध्ये पोटाच्या उपचारांसाठी दाखल होते. वॉर्डाच्या बाहेरच्या व्हरांड्यात ते पडले होते. एका बाजूला रिकाम्या डब्यांची चळत होती, दुसºया बाजूला रोग्यांच्या गाद्यांचा गठ्ठा. त्यांच्या पलंगावर वर्तमानपत्रांचा ढीग होता आणि ते वाचत होते. फर्नांडिस वाचतात खूप. त्यांनी वाचून-वाचूनच स्वत:चं शिक्षण करवून घेतलं. मी त्यांना विचारलं, ‘‘एखाद्या संपात खूप मार खाल्ला असा संप आठवतो का?’’फर्नांडिस म्हणाले, ‘‘तसा मार बºयाच संपांत खाल्ला आहे; पण कामगार चळवळीत कधीच ‘मार’ बसत नाही, अशी माझी श्रद्धा आहे. उदाहरणेच द्यायची तर किती तरी देता येतील. आम्ही एका हॉटेलसमोर कामगारांच्या पगारवाढीसाठी ११ महिने पिकेटिंग केलं, काही परिणाम झाला नाही.
सरळ आपटी खाल्ली; पण त्यातूनच पुढे हॉटेल कामगारांची चळवळ फोफावली. म्युनिसिपल कामगारांचा संप फसला तेव्हा ४०० कामगारांना काढलं आणि कित्येक हजार कामगारांवर अन्याय झाला; पण त्याचा परिणाम असा झाला, की केवळ मुंबईतच नव्हे तर सगळ्या हिंदुस्थानात राहणीमान निर्देशांक लावायला सुरुवात झाली.

हॉटेल कामगारांचा संप
त्यांच्या दृष्टीने त्यांनी मिळविलेला सर्वांत मोठा संस्मरणीय विजय म्हणजे १६ मे १९६२ रोजी मुंबईच्या एक लाख हॉटेल कामगारांनी केलेला एक दिवसाचा अभूतपूर्व संप. हा संप कसा काय संघटित केला, याविषयीची विचारणा त्यांना ब्रिटन-अमेरिकेतील कामगार संघटनांकडूनही झाली.

मुंबईतल्या सुमारे दहा हजार हॉटेलांमधून महिन्याला केवळ ५ ते ७ रुपयांवर काम करणाºया गरीब हॉटेल कामगारांना संघटित करणे, ही त्या वेळी अशक्य गोष्ट समजली हात होती. हॉटेल व्यवसाय हा कारखानदारीत धरला जात नव्हता आणि या कामगारांकडे सगळ्यांचेच पूर्ण दुर्लक्ष होत होते. बाहेरच्या गावाहून मोठी स्वप्नं घेऊन आलेली मुलं काही काम न मिळाल्याने हॉटेलमध्ये लागत. विफल होत आणि वाईट मार्गाला लागतं.

हॉटेलमध्ये कामगारांची गाºहाणी सोडविण्यासाठी प्रयत्न झाले; पण जोवर या साºया कामगारांमध्ये एकी नव्हती, तोवर हे शक्य नव्हते. फर्नांडिस यांनी रात्रंदिवस या कामगारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांची अभेद्य संंघटना स्थापन केली आणि या केवळ एका दिवसाच्या संपाने त्यांना मासिक किमान ७५ रु. मिळवून देण्याची व्यवस्था केली.

देशाची फिकीर कुणाला?
फर्नांडिस यांनी ट्रेड युनियनिझमचा सखोल अभ्यास केला आहे. कामगार चळवळ केवळ व्यावहारिक फायद्यासाठी किंवा केवळ राजकीय फायद्यासाठी चालविणाºयांवर त्यांचा आक्षेप आहे. ते म्हणतात, ‘‘कामगार चळवळ समाजकारणापासून अलग राहूच शकत नाही. स्वतंत्र चळवळ टिकूच शकत नाही. चळवळीपुढे समाजहिताची मोठी दृष्टी पाहिजे, तरच तीतून काही कायमस्वरूपाचे निष्पन्न होते. म्हणूनच कामगार चळवळ व समाजवादी चळवळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे वाटते.’’

संपामुळे राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होतं, उत्पादनात खीळ पडते, हा विषय मी काढला. फर्नांडिस बोलू लागले, ‘‘...आणि आजपर्यंत लढ्याशिवाय मालकांनी आम्हाला काय दिलं? त्यांना जर देशाची फि कीर असली तर त्यांनी ही पाळी आणलीच नसती. चिनी आक्रमणाच्या वेळी कामगारांचे संप निदर्शने टाळण्याविषयीची एक योजना मी स्वत: आपणहून तयार करून सरकारकडे आणि कारखानदारांकडे पाठवली होती. एकट्या नवल टाटांनी त्या योजनेविषयी थोडीशी उत्सुकता दाखवली. त्या वेळी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी तर त्या योजनेला चक्क केराची टोपली दाखवली.’’

रेल्वेची चाके
अवघ्या ३६ वर्षांचा हा ब्रह्मचारी लढाऊ कामगार नेता बोलण्यात तिखट, हजरजबाबी आणि मनमिळाऊ वाटतो. मराठी, हिंदी, उर्दू, कोकणी, कानडी आणि इंग्रजी या भाषा त्यांना अस्खलितपणे बोलता येतात. मी त्यांना विचारलं, ‘‘मुंबईच्या लोकलच्या मोटरमेनना केव्हा संघटित करणार बोला.’’ त्यावर चुटकी वाजवून ते म्हणाले, ‘‘दोन वर्ष. तुम्ही मला

Web Title: George's ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.