Announcement of the eleventh central entrance schedule | अकरावी केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अकरावी केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

ठळक मुद्देबुधवारपासून प्रवेश : १ जुलैला सर्वसाधारण गुणवत्ता यादी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल लागल्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. १९ ते २३ जूनदरम्यान प्रवेशाचा भाग दोन विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी आर्ट, कॉमर्स, सायन्स व एमसीव्हीसीसाठी अद्याप अर्जाचा पहिला भाग भरला नाही, अशांनाही तो भरता येणार आहे. बायफोकलची पहिली गुणवत्ता यादी २५ जून, तर साधारण गुणवत्ता यादी १ जुलै रोजी जाहीर होणार आहे.
कनिष्ठ आणि नामांकित महाविद्यालयांतील ७० टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालये अकरावीचे नियमित वर्ग सुरू करू शकतात. एकत्र वर्ग घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी कनिष्ठ महाविद्यालयांची असणार आहे. वेळापत्रकांमध्ये त्यांच्याकडील व्यवस्थापन व इनहाऊस कोट्यातील जागा केव्हाही समर्पित करू शकतात.
अल्पसंख्याक महाविद्यालये त्यांचा अल्पसंख्याक कोटा तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर समर्पित करू शकतात, ही बाब शिक्षण विभागाने स्पष्ट केली आहे. प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरीचे वेळपत्रक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून जाहीर होणार असल्याचे प्रवेश समितीचे सदस्य अरविंद मंगळे यांनी स्पष्ट केले. कला ३३७०, वाणिज्य २३१०, विज्ञान ५९२०, एमसीव्हीसी ३०२० अशा एकूण १४, ६६० जागा जिल्ह्यांत अकरावीच्या प्रवेशासाठी राखीव आहेत.

असे आहे वेळापत्रक
१९ ते २३ जून बायोफोकल प्रवेश अर्ज, पसंतीक्रम भरणे, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचेही अर्ज भरणे. १९ ते २९ जूनपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व शाखा आणि बायोफोकल यामध्ये भाग १ आणि भाग २ अर्ज भरणे. गुणवत्ता यादी वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. २६ व २७ जून रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत बायोफोकल विषयाच्या पहिल्या यादीतील आॅनलाईन प्रवेश करणे. १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे. २ व ३ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता अर्जांची पुनर्तपासणी करणे आणि हरकती नोंदविणे. ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गुणवत्ता यादी. ८ ते ९ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजता पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे. १० जुलै रोजी सकाळी ११ ते ३ वाजेदरम्यान रिक्त जागांचा तपशील. ११ व १२ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान अर्जाचा भाग भरणे आणि दुरूस्तीसाठी उपलब्ध. १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे. १६ व १७ जुलै रोजी सकाळी ११ ते ५ वाजता दुसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश. १८ जुलै सकाळी ११ ते ३ वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश. १९ ते २० जुलै रोजी सकाळी ११ ते ५ वाजता अर्जाचा भाग १ आणि २ भरण्यासाठी आणि दुरूस्तीसाठी उपलब्ध. २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे. २४ व २५ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजता तिसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे. २६ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता तिसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे. २६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे आणि दुसºया फेरीचा कटआॅफ जाहीर करणे. २७ जुलै सकाळी ११ ते ५ वाजता अर्जांचा भाग १ आणि भाग २ भरण्यासाठी दुसºया भागातील दुरूस्तीसाठी उपलब्ध. ३१ जुलै सायंकाळी ६ वाजता विशेष गुणवत्ता यादी जाहीर करणे. १ आणि २ आॅगस्ट सकाळी ११ ते ५ पर्यंत विशेष गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश. ३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे.

Web Title: Announcement of the eleventh central entrance schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.