युवकांनो, विदर्भासाठी पुढे या

By Admin | Updated: July 24, 2016 00:29 IST2016-07-24T00:29:20+5:302016-07-24T00:29:20+5:30

राजकीय हेतूसाठी विदर्भाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्या जात आह. विदर्भ मिळवायचे असेल तर हीच एक सुवर्ण संधी असून ....

Youths, come forward for Vidarbha | युवकांनो, विदर्भासाठी पुढे या

युवकांनो, विदर्भासाठी पुढे या

व्याख्यान कार्यक्रम : वामनराव चटप यांचे प्रतिपादन
भंडारा : राजकीय हेतूसाठी विदर्भाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्या जात आह. विदर्भ मिळवायचे असेल तर हीच एक सुवर्ण संधी असून विदर्भाच्या लढ्यात युवकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. कारण उद्याचे विदर्भाचे नेते व धुरा युवकांच्या खांद्यावर राहणार आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले.
येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात 'स्वतंत्र विदर्भ राज्य का?' यावर व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप होते. उद्घाटन अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या हस्ते करण्यात आले., प्रमुख अतिथी नितीन रोंघे, भंडारा जिल्हा प्रभारी माजी आमदार अ‍ॅड. आनंदराव वंजारी, जिल्हा युवाध्यक्ष तुषार हटेवार, अर्जुन सूर्यवंशी, दामोदर क्षीरसागर, कार्यक्रमाचे आयोजक चंदनसिंग रोटेले, महाविद्यालयाचे संचालक केदारसिंग रोटेले उपस्थित होते.
प्रास्ताविक अ‍ॅड.आनंदराव वंजारी यांनी केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे शासनाची उदासिनता जबाबदार असून गोसेखुर्द, बावनथडी सारखे प्रकल्प अजूनही रखडले आहेत. नितीन रोंघे यांनी विदर्भातील युवकांवर कशाप्रकारे नोकऱ्यांमध्ये अनुशेष व अन्याय सहन करावा लागत याची माहिती दिली. डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे होणारे फायदे, अर्थिक, भौगोलिक संपत्तीने विदर्भ कसा समृद्ध आहे, हे सागितले. प्राचार्य चंदनसिंग रोटेले यांनी, यापुढे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातिल मित्र परिवाराला जागरुक करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
यावेळी भारत चौधरी, मयुर निंबार्ते, सारंग तिडके, राहुल बांते, आशीषकुमार मेश्राम, प्रवीण बनकर, निकेश रेहपाडे, सचिन बोंद्रे, पूजा बालपांडे, सुरेखा गायधने, रोहिणी बांगळकर, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. संचालन डॉ. सी. पी. मालवीय यांनी केले. आभार डॉ. आरती पवार यांनी मानले. विदर्भाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Youths, come forward for Vidarbha