आर्थिक वादातून घाटनांद्रा येथे एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 15:06 IST2018-12-29T15:06:01+5:302018-12-29T15:06:04+5:30

जानेफळ: मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या घाटनांद्रा येथे आर्थिक वादातून एकाचा खून झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेदरम्यान घडली.

youth murders in Ghatnandra | आर्थिक वादातून घाटनांद्रा येथे एकाचा खून

आर्थिक वादातून घाटनांद्रा येथे एकाचा खून

 

जानेफळ: मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या घाटनांद्रा येथे आर्थिक वादातून एकाचा खून झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांनी पाच ते सहा जणा विरोधात गुन्हा दाखल  केला. घाटनांद्रा येथील अक्षय देविदास जाधव (२६) आणि कृष्णा भिकाजी ठग (३०) यांच्यात आर्थिक वाद होता. त्या वादातून कृष्णा भिकाजी ठग व त्याच्या काही सहकार्यांनी अक्षय देविदास जाधव यास घाटनांद्रा येथे रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास आर्थिक कारणावरून बाचाबाची झाली. दरम्यान त्याचे पर्यावरण हाणामारीत झाले. त्यात अरक्षयला लाथा, बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने तो जखमी झाला होता. त्याला त्याच्या नोतवाईकांनी जानेफळ येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला, असे जानेफळचे ठाणेदार गौरीशंकर पाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, अक्षयचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त झालेल्या त्याच्या नातेवाईकांनी जानेफळ पोलिस ठाणे गाठून कृष्णा भिकाजी ठग व त्यांच्या सहकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.  या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही पोलिस सुत्रांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर जानेफळ पोलिस ठाण्यासमोर मृतक अक्षय देविदास जाधव याच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: youth murders in Ghatnandra