विष प्राशन करून युवकाची आत्महत्या; टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण अस्पष्ट

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 22, 2023 15:04 IST2023-12-22T15:04:34+5:302023-12-22T15:04:39+5:30

सरकारी दवाखान्यातील डॉ. कुरंजेकर, भंडारा व लाखनीचे पोलिस नायक यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Youth commits suicide by consuming poison | विष प्राशन करून युवकाची आत्महत्या; टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण अस्पष्ट

विष प्राशन करून युवकाची आत्महत्या; टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण अस्पष्ट

भंडारा : लाखनी तालुक्यातील आलेसूर येथील १८ वर्षीय तरूणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. विभोर रंजित श्यामकुवर असे त्याचे नाव असून २१ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता त्याने आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले.

त्याने विष घेतल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान त्याला उपचाराकरिता भंडारा येथील सरकारी दवाखान्यात भरती केले. मात्र उपचारादरम्यान रात्री १२:१५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सरकारी दवाखान्यातील डॉ. कुरंजेकर, भंडारा व लाखनीचे पोलिस नायक यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मृत्यूचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. पुढील तपास हवालदार नीलेश रामटेके करीत आहेत.

Web Title: Youth commits suicide by consuming poison