पोक्सोअंतर्गत युवकाला अटक; अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2023 12:43 IST2023-04-20T12:42:29+5:302023-04-20T12:43:46+5:30
या प्रकरणी तरूणीच्या नातेवाईकांनी बुधवारी रात्री तुमसर पोलिसात जाऊन तक्रार नोंदविली.

पोक्सोअंतर्गत युवकाला अटक; अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
- गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : तुमसर तालुक्यातील खापा येथील एका २४ वर्षीय तरुणावर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत कारवाई केली. प्रशांत पुनेश्वर चिखलमुंडे (२४ वर्षे) असे या तरूणाचे नाव आहे. गोंदीया जिलह्यातील एक अल्पवयीन मुलगी आपल्या एका नातेवाईकाकडे येत असायची. यातून त्याची मुलीशी ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेऊन लग्नाचे आमिष दाखवून प्रशांतने तिचे लैंगिक शोषण केले.
या प्रकरणी तरूणीच्या नातेवाईकांनी बुधवारी रात्री तुमसर पोलिसात जाऊन तक्रार नोंदविली. यावरून पोलिसांनी प्रशांतला ताब्यात घेऊन गुरूवारी सकाळी १० वाजता पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.