शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

तुमसरचा ‘तो’ दानदाता नव्हे तर अतिक्रमणधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 21:47 IST

येथील राजेंद्र नगरातील वादग्रस्त जमिनीचे आतापर्यंत आपल्याच पूर्वजांनी नगरपरिषदेला जमीन दान केल्याचा कांगावा करणाऱ्यांचे श्री संताजी स्नेही समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बिंग फोडले. परिणामी दानवीर म्हणून मिरविणाराच आता अनाधिकृत अतिक्रमणधारी असल्याचे सिद्ध झाले आहे.

ठळक मुद्देगुन्हा नोंदविण्याची मागणी : संताजी स्नेही समाजने फोडले बिंग

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येथील राजेंद्र नगरातील वादग्रस्त जमिनीचे आतापर्यंत आपल्याच पूर्वजांनी नगरपरिषदेला जमीन दान केल्याचा कांगावा करणाऱ्यांचे श्री संताजी स्नेही समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बिंग फोडले. परिणामी दानवीर म्हणून मिरविणाराच आता अनाधिकृत अतिक्रमणधारी असल्याचे सिद्ध झाले आहे.येथील राजेंद्र नगरातील सीताराम बालाजी चकोले यांच्या मालकीचे खसरा नं.७८१ मध्ये २.८६ एकर जमिनीत भदुजी पाण्याची टाकी तलाव होते. त्या ठिकाणी शहरातील कचरा टाकत असल्याने परिसरातील नेहमीच दुर्गंधी येत होती. परिणामी नगरपरिषदेद्वारे टाकी मालकांना वारंवार नोटीसी बजावून पाण्याची टाकी साफ करण्याची ताकीद दिली. मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सदर जागा नगरपरिषदेने भूअर्जन करण्याचा ठराव १९५५ मध्ये घेतला. त्यानुसार ३० जुलै १९६० रोजी २.८६ एकर जागेपैकी १.५३ एकर भूअर्जन करण्यात आली. अवार्ड पास झाला व त्या जमिनीचा त्यावेळचे १.६३७ रुपये मोबदला ही त्यांना देण्यात आला. तर उरलेली १.३३ एकर जागा ही टाकी सभोवतालची पाळीची संपूर्ण जागा अ‍ॅक्वायर करण्यासाठी नगरपरिषदेने ९ एप्रिल १९६१ रोजी विशेष सभेचे आयोजन करून नोटीफिकेशन काढण्यात आले. २० मार्च १९६५ ला राज्यपाल मुंबई व तुमसर नगरपरिषदेमध्ये सदर जागेबाबत करार करण्यात आला. त्या जागेचा मोबदलाही दिला. १९७१ पासून शिट नं.८ मध्ये ती जागा नगरपरिषद आरक्षण असे नमूद झाले. परंतु नगरपरिषदच्या दुर्लक्षामुळे त्या जागेचा फेरफार घेण्यात आलाच नाही. त्यामुळे सदर जागेचा सातबारावर सीताराम व त्यांचे वारस बाबूलालचे नाव असल्याचा फायदा घेत बाबूलाल चकोले यांचा मुलगा अशोक चकोलेनी ती जागा आमच्याच मालकीची आहे व आम्हीच नगरपरिषदेला जागा दान केली असल्याचा कांगावा करीत होते. त्याच ठिकाणी त्याने स्वत:चे घर व दुकानाची चाळ उभारली आहे.सदर जागेचा त्यावेळच्या रेडीरेकनरच्या रेटनुसार मोबदलाच देण्यात आला तर यांची जागा कशी? त्याचप्रमाणे जागेचा मोबदलाच घेण्यात आला असताना यांनी दान केलीच कशी? असा सवाल उपस्थित करण्यात आला. अनधिकृत अतिक्रमणधारकाचे अतिक्रमण पाडण्यात यावे तसेच दुकान भाडेही चकोले यांच्याकडून वसूल करण्यात यावे. त्याचबरोबर नगरपरिषदेची दिशाभूल करवून शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दानदाता म्हणून सत्कार केले तो सत्कार अवार्ड परत करून माफी मागावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही श्री संताजी स्नेही समाज मंडळाच्यावतीने करण्यात आली. एक महिन्यात कारवाई न तीव्र आंदोलन करण्यात्चा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.यावेळी मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र बरडे, जगदिश कारेमोरे, शंकर बडवाईक, विनोद मानापुरे, सुरेश मलेवार, सुदेश थोटे, अ‍ॅड.राजेंद्र भुरे, वसंत हटवार, माला भुरे, मधुमती साखरवाडे, रामकृष्ण मलेवार, सुधाकर कारेमोरे, विजय गिरीपुंजे, सरोज भुरे, अरुण लांजेवार, सुनिल लांजेवार उपस्थित होते. आता या प्रकरणी काय कारवाई होत याकडे तुमसरवाशीयांचे लक्ष लागले आहे.सदर वादग्रस्त जागेत १९७१ पासून श्री संताजी स्नेही समाज मंडळाला नगरपरिषदेने ठराव घेऊन ताबा दिला होता. मात्र या दानवीराने संताजी मंडळानी जागा हडपल्याची खोटी तक्रार नगरपरिषदेला दिली. त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाºयांनी १९५५ पासूनचा रेकॉर्ड मिळवून तथाकथीत दानवीराचे सत्य समोर आणले.