इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाने मुक्त हस्ताने देणगी म्हणून दिलेल्या वैनगंगा नदीपात्रातील रेतीची सर्रास लूट सुरू आहे. १० वर्षांपुर्वी अवघ्या ७०० रूपयात ट्रॅक्टर भर मिळणारी रेती आता तीन हजारापर्यंत मिळत आहे. आपलीच रेती आपल्यासाठी महाग ठरत आहे. गौण साधन संपत्तीने विपुल असलेल्या भंडारा जिल्ह्यात तस्कर खुलेआम लुटच करीत आहेत.तुमसर तालुक्यातील बावनथडीच्या विशाल पात्र ते लाखांदूर तालुक्यातील शेवटच्या टोकात असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध तस्करी व वाहतूक होत असल्याची बाब सर्वांसाठी नवीन नाही. गौण खनिजांची ही लूट अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र वरिष्ठ ते कनिष्ठस्तरापर्यंत असलेल्या संगनमताच्या चेनने कोट्यवधींच्या उलाढालीला बळकटी प्राप्त करून दिली आहे. महसूल प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय कुणीही धाडस करू शकत नाही. विशेष म्हणजे यासाठी रेतीमाफिया विविध शक्कल लढवित असतात. आड मार्गांचा वापर रेतीच्या वाहतुकीसाठी केला जातो. तलाठी ते तहसील कार्यालय व तहसील कार्यालय ते खनिकर्म विभाग अशी कंत्राटदारांची सुत्रता असलेल्यांचे ओले हात रेतीच्या उलाढालीतून झाले आहेत.ऐन पावसाळ्यापुर्वी रेतीची ठिकठिकाणी डम्पिंग करून त्याची चोरीछुप्या मार्गाने विल्हेवाट लावली जाते. एखाद्या कर्तबगार अधिकाऱ्याने धाड घातलीच तर त्यापुर्वीच रेती तस्कराला याची माहिती मिळत असते. महसूल प्रशासनापेक्षा रेती तस्कारांची यंत्रणा तगडी आहे. वेळप्रसंगी अंगावर धावून जीव घेण्याचा प्रकारही घडला आहे. जीवाच्या आकांताने अधिकारी व कर्मचारीही या गैरजबाबदार व लुटमारीला आळा घालण्यात सपेशल अयशस्वी ठरले आहेत. आपलीच रेती जिल्हाबाहेर मोठ्या दराने विकून तस्कर रातोरात गब्बर झाले आहेत. अर्थातच यासाठी स्थानिकांचे पाठबळ आहे.वाहतुकीसाठी चोरट्या मार्गांचा अवलंबतुमसर, मोहाडी, पवनी तालुक्यात रेती चोरीला उधाण आले आहे. रेतीची वाहतूक करीत असताना मुख्य रहदारी असलेल्या रस्त्यांचा उपयोग न करता चोरट्या मार्गांचा अवलंब रेतीच्या वाहतुकीसाठी केला जात असतो. जिल्हाबाहेर म्हणजेच विदर्भात वैनगंगेच्या रेतीला सर्वदूर मागणी आहे. जिल्ह्यात १२ ते १३ हजार रूपयात उपलब्ध होणारी एक ट्रक रेती नागपुरात ३३ ते ३६ हजार रूपये दराने विकली जाते. तालुका सीमांतर्गत याच रेतीचे भाव १२ ते १६ हजार रूपये प्रती ट्रक दराने उपलब्ध होते. येथेही जिल्हा वासीयांची मोठी लूट सुरू आहे. स्थानिक पातळीवर रेती असतानाही आपल्यासाठीच महाग ठरली आहे.
आपलीच रेती आपल्यासाठी ठरतेय महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST
ऐन पावसाळ्यापुर्वी रेतीची ठिकठिकाणी डम्पिंग करून त्याची चोरीछुप्या मार्गाने विल्हेवाट लावली जाते. एखाद्या कर्तबगार अधिकाऱ्याने धाड घातलीच तर त्यापुर्वीच रेती तस्कराला याची माहिती मिळत असते. महसूल प्रशासनापेक्षा रेती तस्कारांची यंत्रणा तगडी आहे. वेळप्रसंगी अंगावर धावून जीव घेण्याचा प्रकारही घडला आहे. जीवाच्या आकांताने अधिकारी व कर्मचारीही या गैरजबाबदार व लुटमारीला आळा घालण्यात सपेशल अयशस्वी ठरले आहेत.
आपलीच रेती आपल्यासाठी ठरतेय महाग
ठळक मुद्देविदर्भात प्रचंड मागणी : शेतशिवारात ठिकठिकाणी डम्पिंग, पावसाळ्यात कोट्यवधींची उलाढाल