लहान भावाची मोठ्या भावाला जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:26 IST2021-06-01T04:26:28+5:302021-06-01T04:26:28+5:30

लाखांदूर : सायंकाळच्या सुमारास मोठा भाऊ घरी काम करीत असताना मद्यधुंद अवस्थेत आलेल्या लहान भावाने मोठ्या भावाशी शिवीगाळ करीत ...

The younger brother beats the older brother | लहान भावाची मोठ्या भावाला जबर मारहाण

लहान भावाची मोठ्या भावाला जबर मारहाण

लाखांदूर : सायंकाळच्या सुमारास मोठा भाऊ घरी काम करीत असताना मद्यधुंद अवस्थेत आलेल्या लहान भावाने मोठ्या भावाशी शिवीगाळ करीत जबर मारहाण केल्याची केल्याची घटना घडली. सदर घटना तालुक्यातील दोनाड येथे गत ३१ मे रोजी सायंकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मोहन मुकरण दिघोरे (६५) असे फिर्यादी मोठ्या भावाचे नाव असून अनिल मुकरण दिघोरे (३५) रा. दोनाड असे घटनेतील लहान भावाचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास घटनेतील जखमी फिर्यादी आपल्या राहत्या घरी होते. दरम्यान, घटनेतील आरोपी लहान भाऊ मद्यधुंद अवस्थेत येत जागेच्या वाटणीवरून वाद घालत भांडण केले. सदर भांडणात आरोपीने मोठ्या भावाच्या डोक्यावर लोखंडी पावशीने वार केला. यावेळी फिर्यादी जबर जखमी झाले. यावेळी फिर्यादीच्या डोक्यावर मारहाण करताना पाहून सून धावत येत भांडण सोडवायला गेली. संबंधित महिलेला आरोपीने धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: The younger brother beats the older brother