शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

‘रिव्हर्स गिअर’वर भारतभ्रमणावर निघाले तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:10 IST

देशाचा एकही जवान सिमेवर शहीद होऊ नये, जम्मू काश्मिरचा प्रश्न मार्गी लागून दहशतवाद संपुष्टात यावा. याची जनजागृती व्हावी यासाठी पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील तरुण भारत भ्रमणावर निघाले आहेत.

ठळक मुद्देस्वच्छता, स्वदेशीचा जागर : १० हजार किमीचा प्रवास पूर्ण, साडेतीन हजार किमीचा प्रवास शिल्लक

आॅनलाईन लोकमतबेला (भंडारा) : देशाचा एकही जवान सिमेवर शहीद होऊ नये, जम्मू काश्मिरचा प्रश्न मार्गी लागून दहशतवाद संपुष्टात यावा. याची जनजागृती व्हावी यासाठी पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील तरुण भारत भ्रमणावर निघाले आहेत. विशेष म्हणजे हे तरूण ‘रिव्हर्स कार’ चालवित आहेत. दरम्यान बेला - मुजबी मार्गे नागपूरकडे जाताना त्यांचे स्वागत करून त्यांना या उपक्रमाबद्दल विचारले असता त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली.संतोष चंद्रकांत राजेशिर्के असे त्या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा शिंदगवळी ता.भोर जि.पुणे येथील असून एका खासगी कंपनीत कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत आहे. मागील तीन महिन्यापासून देशातील २४ राज्यात त्यांनी भ्रमण केले आहे.१० जानेवारी रोजी स्विफ्ट कारने संपूर्ण भारत भ्रमण ‘रिव्हर्स गियर’ने रिव्हर्स कार चालवित जात आहेत. रिव्हर्स कार चालविण्यामागील कारण विचारले असता काहीतरी नवीन करण्याची आवड असल्यामुळे हा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. रिव्हर्स कार चालविण्याचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी एक दुचाकी बुलेटसुद्धा बरोबर घेतली आहे. त्याचा सहकारी अक्षय पवार हा दुचाकी चालवत सोबत येत आहे.भारतीय जवानांना सिमेवर जावून मनोबल वाढविणे, पाकिस्तानच्या कैदेमध्ये असलेले कुलभूषण जाधव तसेच इतर भारतीय बंदींना भारत सरकारने सोडवून आणावे. भारतीयांनी विदेशी वस्तूचा त्याग करून स्वदेशीचा वापर करावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन ज्याठिकाणी जातो त्याठिकाणी स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत ९,७५० कि.मी. प्रवास झाला असून अजून ३,५०० कि.मी. चा प्रवास शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.अहमदनगर, औरंगाबाद, सिंदखेड राजा येथे १२ जानेवारीला जिजाऊंना अभिवादन करून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल सिलीगुडी मार्गे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, मणीपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, पुढे पश्चिम बंगाल मार्गे बिहारमार्गे झारखंड, ओडिसा, छत्तीसगडमार्गे भंडारा जिल्ह्यातून नागपूरकडे रिव्हर्स कार चालवित जात आहेत. नागपूरमार्गे तेलंगाणा, आंध्रप्रदेश, तामिलनाडू, केरळ, गोवा, कर्नाटक व पुन्हा महाराष्ट्रात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.