खोल पाण्यातून गाय बाहेर काढणे जीवावर बेतले; तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 13:41 IST2021-09-11T13:39:53+5:302021-09-11T13:41:15+5:30

पवनी तालुक्याच्या वाहीची घटना. खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि रुपेश व गाय दोघेही पाण्यात बुडाले.

Young man drowns in lake at Bhandara Pavani Taluka | खोल पाण्यातून गाय बाहेर काढणे जीवावर बेतले; तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

खोल पाण्यातून गाय बाहेर काढणे जीवावर बेतले; तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

पवनी (भंडारा) : घरची गुरे चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वाही येथे  शनिवारी सकळी ७.३० वाजता उघडकीस आली. तो गुरे चारण्यासाठी शुक्रवारी घरून गेल्यानंतर बेपत्ता होता.  या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

रुपेश उर्फ वैभव रघुनाथ शहारे (१७) रा. वाही असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शुक्रवारी दुपारी घराची जनावरे घेऊन गाव तलावाकडे चाराण्यासाठी गेला होता. सायंकाळी घराकडे परत येत असताना एक गाय तलावाच्या पाण्यात गेली. तिला काढण्यासाठी रुपेश तलावात उतरला. मात्र खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि रुपेश व गाय दोघेही पाण्यात बुडाले. एकडे रुपेश हा जनावरे घेऊन घरी परत न आल्याने शोधाशोध सुरू झाली. गावकऱ्यांच्या मदतीने तलावाकडे धाव घेतली. शोधाशोध केली असता तलावात गायीचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यामुळे रुपेशही तलावात बुडाला असावा अशी शंका आली. रात्री उशीरापर्यंत तलावात शोध घेण्यात आला. मात्र थांगपत्ता लागला नाही.

शनिवारी सकाळी पुन्हा गावकऱ्यांनी निष्टी व वाही येथील ढिवर बांधवाच्या मदतीने तलावात शोधाशोध सुरू केली. तेव्हा सकाळी ७.३० वाजताचा त्याचा मृतदेह आढळून आला. पवनी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक गणेश बिसने तपास करीत आहेत.

Web Title: Young man drowns in lake at Bhandara Pavani Taluka