तुमसरात युनिक कार्ड अभियानाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2016 07:32 IST2016-06-07T07:32:03+5:302016-06-07T07:32:03+5:30
आधारकार्डच्या यशस्वी योजनेनंतर प्रत्येक घराला यापुढे एक युनिक क्रमांक म्हणजे (परमानंट हाउस नंबर) देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे.

तुमसरात युनिक कार्ड अभियानाला प्रारंभ
तुमसर : आधारकार्डच्या यशस्वी योजनेनंतर प्रत्येक घराला यापुढे एक युनिक क्रमांक म्हणजे (परमानंट हाउस नंबर) देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. तुमसर येथुन नुकतेच या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत बंगले, हॉटेल घर, झोपड्या, कच्चे घर, दुकाने यांचे संपूर्ण सर्वेक्षण करुन केंद्र सरकारचे नगर विकास मंत्रालय व मुख्य निवडणूक आयोग यांना हि माहिती पुरविण्यात येणार आहे याच्या मार्फत हे अभियान राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षण अभियानाचे तिसऱ्या टप्प्याचे शुभारंभ तुमसर शहरापासुन झाले असून नगरपरिषद विभागानंतर नगर पंचायत तसेच ग्रामपंचायत स्तरावर सर्वांचे सर्वेक्षण केले जाईल.
युनिक क्रमांकाचे फायदे
या क्रमांकाचे उपयोग येणाऱ्या काळात जनगणना, निवडणुक विभाग, डाक विभाग, विद्युत वितरण, पोलीस प्रशासन, न्यायालय, कृषी विभाग, राशन कार्ड, मालमत्ता फेरफार, टॅक्स विभाग, रोजगार ई-२१, जलवितरण विभाग अशा विविध २१ विभागामध्ये या युनिक क्रमांकाचे उपयोग होणार आहे. सर्वेक्षणानंतर घराला एक लोखंडाची प्लेट देण्यात येणार यावर घराचा युनिक क्रमांक लिहिलेला असेल हि प्लेट दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेले २० रु. शुल्क आकारले जाणार याकरिता सर्वेक्षणाला येणाऱ्या व्यक्तीकडे त्यांचे ओळखपत्र असेल.
नगराध्यक्षांचे हस्ते शुभारंभ
तुमसरचे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, मुख्य अधिकारी चंद्रशेखर गुल्हाने, जे. बी. ठाकरे, जमील शेख, अर्शद मिर्जा यांच्या उपस्थितीत या युनिक नंबर योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सेंट्रल कमर्शियल इडस्ट्री आॅफ इंडिया या कंपनीचे केंद्रसरकारद्वारे नियुक्ती करण्यात आली असून कपंनीचे पदाधिकारी उमेश गेडाम, दिलीप गायधने उपस्थित होते.
(शहर प्रतिनिधी)