जागतिक पृथ्वी दिन विविध उपक्रमांनी जरासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST2021-04-24T04:35:46+5:302021-04-24T04:35:46+5:30

२३ लोक ०४ के लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे 'जागतिक पृथ्वी दिन' अर्थात 'वसुंधरा दिन' विविध ...

World Earth Day with various activities | जागतिक पृथ्वी दिन विविध उपक्रमांनी जरासा

जागतिक पृथ्वी दिन विविध उपक्रमांनी जरासा

२३ लोक ०४ के

लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे 'जागतिक पृथ्वी दिन' अर्थात 'वसुंधरा दिन' विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. या उपक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा, नेफडो जिल्हा शाखा भंडारा तसेच ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन जिल्हा भंडाराचे सहकार्य लाभले.

यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे संघटक प्रा. अशोक गायधने यांनी जागतिक पृथ्वी दिन अर्थात वसुंधरा दिन जगात का साजरा केला जातो त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सर्वांना समजावून दिली. पृथ्वी या ग्रहावरच सध्या जीवनचक्र आढळत असून, हे जीवनचक्र अबाधितपणे सतत सुरू ठेवायचे असेल तर संयुक्त राष्ट्रसंघाने" Restore The Earth" " रिस्टोअर द अर्थ" या संकल्पनेचे यावर्षी ब्रीदवाक्य ठेवले त्याचा अर्थ त्यांनी सर्वांना समजावून दिला. पृथ्वीवरील जल, जंगल, जमीन तसेच जंगलप्राणी टिकवून ठेवण्याची नितांत आवश्यकता आज निर्माण झाली आहे व त्याकरिता आजच्या कोरोना महामारीच्या काळात सजीव सृष्टीला टिकवण्यासाठी व शाश्वत विकासाकरिता सर्वांनी वृक्षारोपण करणे व अवैध शिकार, प्रदूषण, जंगलतोड, जागतिक तापमानवाढ थांबविण्यासाठी भरघोस प्रयत्न केले पाहिजे आणि २०० वर्षांपूर्वीची "हिरवीगार पृथ्वी" पुन्हा स्थापित करू या असे त्यांनी प्रतिपादन केले. यानिमित्ताने " पृथ्वी चित्र स्पर्धा"चे आयोजन यावेळी करण्यात आले. यावेळी स्पर्धकांनी पृथ्वी वाचवा - Save the Earth- सेव्ह द अर्थ" या संकल्पनेवर सुंदर चित्रे संदेशासहित काढुन आणले. 'जल-जंगल-जमीन-जंगलप्राणी वाचवा-पृथ्वी वाचवा' असा संदेश त्यावर लिहिला व शिवाय त्याबद्दल स्वयंप्रेरित उद्घोष सुद्धा केला. या स्पर्धेत मिडलस्कूल गटात अर्णव गायधनेला प्रथम क्रमांक, मनस्वी गभनेला द्वितीय तर हायस्कूल गटात छविल रामटेकेला प्रथम, तर प्रज्वल भांडारकरला द्वितीय क्रमांक तर ज्युनिअर गटात आशिष खेडकरला प्रथम तर अथर्व गायधने याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. ओम आगलावे व आरू आगलावे यांना प्रोत्साहनपर क्रमांक देण्यात आला.

पृथ्वी प्रश्नमंजूषा स्पर्धेत पूजा रोडे व अथर्व गायधनेला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक योगीता रोडे व अर्णव गायधनेला, तर तृतीय क्रमांक छविल रामटेके, प्रज्वल भांडारकर यांना, तर प्रोत्साहनपर क्रमांक मनस्वी गभने, ओम आगलावे, आरू आगलावे यांना देण्यात आला. दोन्ही स्पर्धेचे परीक्षण प्रा. अर्चना गायधने यांनी केले. या उपक्रमाच्या आयोजनाकरिता ग्रीनफ्रेंड्स, अभाअंनिसचे पदाधिकारी प्रा. अशोक गायधने, अशोक वैद्य, दिनकर कालेजवार ,पंकज भिवगडे, योगेश वंजारी आदींनी सहकार्य केले.

Web Title: World Earth Day with various activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.