बीडीओंसह कर्मचाऱ्यांची तुमसर पंचायत समिती कार्यालयाला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 21:58 IST2018-10-28T21:58:28+5:302018-10-28T21:58:44+5:30
तुमसर पंचायत समिती शुक्रवारी दिवसभर बेवारस होती. संपूर्ण दिवस विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते. विभागाचे गटविकास अधिकारी अनुपस्थित होते. शेकडो ग्रामस्थ कार्यालयीन कामाकरिता पं.स कार्यालयात आल्यावर त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दि. ३ नोव्हेंबर रोजी पं.स. मासिक सभेत सदर मुद्दा उपस्थित करणार असल्याचे पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे उपस्थित करणार आहेत.

बीडीओंसह कर्मचाऱ्यांची तुमसर पंचायत समिती कार्यालयाला दांडी
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर पंचायत समिती शुक्रवारी दिवसभर बेवारस होती. संपूर्ण दिवस विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते. विभागाचे गटविकास अधिकारी अनुपस्थित होते. शेकडो ग्रामस्थ कार्यालयीन कामाकरिता पं.स कार्यालयात आल्यावर त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दि. ३ नोव्हेंबर रोजी पं.स. मासिक सभेत सदर मुद्दा उपस्थित करणार असल्याचे पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे उपस्थित करणार आहेत.
महिन्यातील दुसरा व चवथ्या शनिवार शासकीय सुटीचा दिवस होता. त्यामुळे शुक्रवारीच कार्यालयीन कामे करण्याचा नागरिकांचा भर असतो. पंचायत समिती संपूर्ण तालुक्यातील शासकीय योजनांची अंमलबजावणी करणारे कार्यालय आहे. शुक्रवारी गटविकास अधिकारी तथा इतर कर्मचाºयांनी सकाळी हजेरी लावल्यानंतर कार्यालयातून निघून गेले. त्यानंतर ते कार्यालयात परत आले नाहीत. यात बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग या विभागात खुर्च्या रिकाम्या होत्या.
या संदर्भात पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे यांनी गटविकास अधिकारी मिलिंद बडगे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यावर त्यांनी मी सध्या बाहेर आहे. एवढे बोलून फोन बंद केला.
याप्रकरणी दि. ३ नोव्हेंबर रोजी होणाºया पं.स. मासिक सभेत सदर प्रश्न उपस्थित करून संबंधितांवर कारवाईची मागणी पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे, अरविंद राऊत, राजेंद्र ढबाले यांनी केली आहे.
शुक्रवारी दिवसभर गटविकास अधिकारी तथा इतर विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी पं.स. कार्यालयात अनुपस्थित होते. शेकडो ग्रामस्थांना त्याचा लटका बसला. कर्तव्यचुकार कर्मचाºयांच्या विरोधात मासिक सभेत आवाज उचलणार असून त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची मागणी करणार आहे.
-हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य, तुमसर.