भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यात थ्रेशरमध्ये अडकून मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 03:10 PM2020-03-28T15:10:45+5:302020-03-28T15:11:12+5:30

वटाणा पिकाची मळणी करताना थ्रेशरमध्ये अडकून मजूर ठार झाल्याची घटना पवनी तालुक्यातील वलनी (चौरास) येथे शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

Worker killed in Thrasher in Pawani taluka in Bhandara district | भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यात थ्रेशरमध्ये अडकून मजूर ठार

भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यात थ्रेशरमध्ये अडकून मजूर ठार

googlenewsNext
ठळक मुद्देवलनी येथील घटना



लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वटाणा पिकाची मळणी करताना थ्रेशरमध्ये अडकून मजूर ठार झाल्याची घटना पवनी तालुक्यातील वलनी (चौरास) येथे शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
स्वप्निल भांडे (२७) रा. बेलाटी ता. लाखांदूर असे मृताचे नाव आहे. वलनी येथील शेतकरी अरुण तिघरे यांच्या शेतात शनिवारी वटाना मळणीचे काम थ्रेशरच्या मदतीने करण्यात येत होते. त्यावर स्वप्निल कामाला होता. मशीनमध्ये वटाण्याची पेंढी सरकविताना त्याचा तोल गेला आणि मशीनच्या आतमध्ये डोक्याच्या बाजूने ओढल्या गेला. त्यात जबर मार लागून त्याचा  जागीच मृत्यू झाला. सदर मळणीयंत्र बेलाटी येथील नरेश देशमुख यांच्या मालकीचे असून पवनी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Worker killed in Thrasher in Pawani taluka in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात