तलाठ्यांअभावी कामकाज ठप्प
By Admin | Updated: October 11, 2014 23:00 IST2014-10-11T23:00:44+5:302014-10-11T23:00:44+5:30
परिसरातील पालोरा व मोहगाव येथील तलाठ्यांची पदे रिक्त आहे. पालोरा वगळता देव्हाडा, मोहगाव, करडी, मुंढरी येथील तलाठी कार्यालय किरायाच्या घरात आहेत. स्वत:चे कार्यालय किंवा जमीनही नाही.

तलाठ्यांअभावी कामकाज ठप्प
करडी (पालोरा) : परिसरातील पालोरा व मोहगाव येथील तलाठ्यांची पदे रिक्त आहे. पालोरा वगळता देव्हाडा, मोहगाव, करडी, मुंढरी येथील तलाठी कार्यालय किरायाच्या घरात आहेत. स्वत:चे कार्यालय किंवा जमीनही नाही.
जांभोरा येथे सुसज्ज इमारत तयार आहे. मात्र तलाठी किरायाचे घरात राहतात. एकही तलाठी मुख्यालयी राहत नाही. नागरिकांना विविध कामांसाठी वाट पाहत ताटकळत राहावे लागते.
मोहाडी तालुक्यातील करडी येथे महसूल विभागाचे कामकाज व नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळ कार्यालय आहे. मंडळ अधिकारी म्हणून पठाण कार्यरत आहेत. तलाठी कार्यालय व मंडळ कार्यालय ग्रामपंचायत सचिवालयातील इमारतीत स्वतंत्रपणे आहेत. परंतु कर्मचारी मुख्यालयी राहत नाही.
मंडळ अधिकारी भंडारायेथून तर तलाठी तुमसर येथून अपडाऊन करतात. कार्यालय किरायाने आहेत. पालोरा व जांभोरा येथे तलाठ्यांची इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहेत.
पालोरा येथील कामकाज स्वत:चे इमारतीतून सुरु आहे. मात्र जांभोरा येथील तलाठी कार्यालयाची इमारत धूळ खात उभी आहे. भाड्याचे घर सोडून स्वत:चे मालकीचे इमारतीत कार्यालय स्थालांतरित करण्याचे सौजन्य तलाठी राहांगडाले यांनी दाखविले नाही.
मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार यांनी जबाब विचारण्याची तसदीसुद्धा घेतली नाही. करडी परिसरातील सहा तलाठ्यांपैकी एकही तलाठी मुख्यालयी राहत नाही. परिणामी नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. अनेकदा नागरिक तलाठ्यांची वाट पाहत तासन्तास बसून असलेले दिसतात. (वार्ताहर)