शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमच काम करतोय, या भावनेने कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:24 IST

ऑनलाईन लोकमतभंडारा : दीर्घकाळाचा अनुभव अनेकांच्या पाठीशी आहे. अनुभव असल्यास डोक्यात शिरलं की गफलत होते. त्यातून चुका होण्याची शक्यता असते. परीक्षेचे काम सहजतेने होण्यासाठी आपण प्रथमच काम करतोय या भावनेने कार्य केल की, पुढे भानगडी पासून दूर राहता येईल, असे प्रतिपादन नागपूर विभागीय मंडळाचे सहायक सचिव संजय आयलवार यांनी केले.लाल ...

ठळक मुद्देसंजय आयलवार यांचे प्रतिपादन : शास्त्री विद्यालयात केंद्र संचालकांची सभा

ऑनलाईन लोकमतभंडारा : दीर्घकाळाचा अनुभव अनेकांच्या पाठीशी आहे. अनुभव असल्यास डोक्यात शिरलं की गफलत होते. त्यातून चुका होण्याची शक्यता असते. परीक्षेचे काम सहजतेने होण्यासाठी आपण प्रथमच काम करतोय या भावनेने कार्य केल की, पुढे भानगडी पासून दूर राहता येईल, असे प्रतिपादन नागपूर विभागीय मंडळाचे सहायक सचिव संजय आयलवार यांनी केले.लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे दहावीच्या केंद्र संचालक, सहायक परिरक्षक यांची सभा घेण्यात आली. परीक्षेचे बदलते स्वरूप याविषयी माहिती देताना संजय आयलवार यांनी सांगितले. यावेळी मोहाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे, प्राचार्य दत्तात्रय देशमुख यांची उपस्थिती होती. दहाविची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत आहे. भंडारा जिल्ह्यात दहाविचे ८९ परीक्षा केंद्र आहेत. या परीक्षा केंद्रावर २० हजार ४३० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ९ परीरक्षक केंद्र ठेवण्यात आले आहे. अतिरिक्त केंद्र संचालक या ऐवजी सहायक परिरक्षक असे नामानिधान करण्यात आले. दहाविच्या परीक्षा केंद्रावर दररोज सहायक परिरक्षकांना फिरते ठेवले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील कस्टोडियन केंद्रावर अतिरीक्त सहायक परिरक्षक नेमण्यात आले आहेत. यावेळी एखाद्या सहायक परिरक्षकाला परीक्षा केंद्रावर जाण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे वाईट वाटून घ्यायचे नाही, असेही संजय यावलवार म्हणाले, केंद्र संचालकांना सहकार्य करा. गैरमार्ग प्रकरण होवू नयेत यासाठी काटेकोरपणे व्यवस्था सांभाळा. तरीही परीक्षेत गैरमार्ग प्रकरण झाले तर लगेच कस्टोडियन यांना कळवा. कस्टोडियन हे मंडळापर्यंत लगेच माहिती देणार आहेत. गैर मार्ग प्रकरणाची माहिती शासनाला मंडळ त्याचदिवशी कळविणार असल्याचेही सांगण्यात आले. दहाविची उत्तरपत्रिका २० पानांची आहे. त्या उत्तरपत्रिकेचा रंग निळसर आहे. केंद्रापर्यंत नवीन उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्या उत्तर पत्रिकांना बारकोड दिला आहे. त्यामुळे जुन्या उत्तरपत्रिका वापरता येणार नाही. परीक्षा संपल्यावर उत्तरपत्रिकेचा हिशेब सादर करावा लागणार आहे. उत्तरपत्रिका शिल्लक नसल्याचे प्रमाणपत्र केंद्रसंचालकांना द्यावे लागणार आहे. पुरवणी चार पाणाची नव्याने देण्यात आली आहे. बैठक व्यवस्था केंद्रसंचालकांनी आपल्या सोयीनुसार केली तरी चालणार आहे. प्रश्नपत्रिकांचे लिफाफे केंद्र संचालक, सहायक परिरक्षक, विद्यार्थी व पोलीस यांच्या समोरच फोडले जावेत. प्रश्नपत्रिका वाटपाची प्रक्रिया जूनिच आहे.विद्यार्थ्यांनी १०.३० वाजता परीक्षा दालनात घेण्यात यावे. ११ वाजता येणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रवेश देवू नये. एखादा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा आला असल्यास त्याच्या उशिरा येण्याची कारणे जाणून घेण्यात येतील. त्यासाठी उशिरा येणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी वेगळा रजिस्टर केला जाणार आहे. उशिरा येणाºया विद्यार्थ्याला परीक्षा खोलीत पाठविण्यापुर्वी परीक्षा मंडळाशी केंद्रसंचालकांनी संपर्क साधला असता मंडळाशी संपर्क झाला नाही .