बजरंग दलाचे कार्य प्रेरणादाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:41 IST2021-09-17T04:41:54+5:302021-09-17T04:41:54+5:30

एकोडी : रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्तामुळे एखाद्याचा प्राण वाचतो. कोरोना संकट काळातही रक्ताची खूप मोठी गरज असताना बजरंग ...

The work of Bajrang Dal is inspiring | बजरंग दलाचे कार्य प्रेरणादाई

बजरंग दलाचे कार्य प्रेरणादाई

एकोडी : रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्तामुळे एखाद्याचा प्राण वाचतो. कोरोना संकट काळातही रक्ताची खूप मोठी गरज असताना बजरंग दलाने रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिर घेऊन जनतेची खूप मोठी सेवा करण्याचे प्रेरणादायी काम केले असून असल्या कार्यक्रमासाठी आपण तन-मन-धनाने सोबत राहू, असे प्रतिपादन खासदार सुनील मेंढे यांनी केले.

येथील जिल्हा परिषद महाविद्यालयात बजरंग दलतर्फे आयोजित रक्तदान व आरोग्य शिबिरात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित माजी आमदार बाळा काशिवार, गुलाब कापगते, दीपक कुभरे, रामदास शहारे, अविनाश ब्राह्मणकर, मनीष कापगते, नेपाल रंगारी, भुमिता तिडके, इंद्रायणी कापगते, रवी गोखले, लखन बर्वे, रमेश खेडीकर, मेघा हुमे, उषा डोंगरवार, भास्कर चिर्वतकर, महेश्वरी नेवारे, विद्या खेडीकार, बेबी मंदाडे, गोविंद लांजेवार, मंदा बडवाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील नागरिकांनी समस्यांचे अनेक निवेदन खा. सुनील मेंढे यांना दिले. लवकरात लवकर समस्याचा निपटारा करू, असे आश्वासन खासदारांनी दिले.

या कार्यक्रमात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून ५०० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश कापगते यांनी केले. संचालन धीरज तरोने यांनी तर आभार वैभव खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन खेडीकर, योगेश्वर हुमे, दामू तरोने, अंकोश मेहर, अक्षय खोब्रागडे, वेदांत खेडीकर, कान्हा खोब्रागडे, अंकित खोब्रागडे, कुणाल तिडके, तेजस तरोने, प्रणय भुरे, गणेश मोहुरले, दिपंशू पोवडे, राकेश महुरकर, अतुल खोब्रागडे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा रक्तपेढी, नेत्रपेढी, आरोग्य विभाग एकोडी, आरोग्य केंद्र चमू, जिल्हा परिषद शाळा एकोडी यांनी विशेष सहकार्य केले.

Web Title: The work of Bajrang Dal is inspiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.