शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरमध्ये आमदारांच्या अटकेसाठी महिलांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

तुमसरचे भाजपा आमदार चरण वाघमारे यांच्यासह भाजप शहर अध्यक्ष अनील जिभकाटे यांच्यावर बुधवारी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांच्या अटकेची मागणी करीत तुमसर शहरातील महिला स्वयंस्फूर्तीने येथील मातोश्री सभागृहासमोर एकत्र आल्या.

ठळक मुद्देएसपींना निवेदन : पोलीस ठाण्यावर धडकल्या महिला

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल असलेले भाजपा आमदार चरण वाघमारे यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी तुमसर येथे महिलांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.तुमसरचे भाजपा आमदार चरण वाघमारे यांच्यासह भाजप शहर अध्यक्ष अनील जिभकाटे यांच्यावर बुधवारी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांच्या अटकेची मागणी करीत तुमसर शहरातील महिला स्वयंस्फूर्तीने येथील मातोश्री सभागृहासमोर एकत्र आल्या. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सहभागी झाले. शहरातील मार्गावरून भ्रमण करीत हा मोर्चा पोलीस ठाण्यावर पोहचला. तेथे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार अनील बावनकर, विजय डेकाटे, राजू कारेमोरे, राजकुमार माटे, डॉ.पंकज कारेमोरे, माधव बांते, प्रमोद तितीरमारे, रमेश पारधी, सीमा भुरे, कुंदा वैद्य, पमा ठाकूर, नैनश्री येळणे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चा