दारूबंदी विरोधात महिलांची रॅली
By Admin | Updated: October 26, 2016 00:49 IST2016-10-26T00:49:02+5:302016-10-26T00:49:02+5:30
ग्रामपंचायतमध्ये महिलांची ग्रामसभा घेवून अवैध धंदे बंद करण्याचा ठराव घेण्यात आला.

दारूबंदी विरोधात महिलांची रॅली
गोंडउमरी येथे उपक्रम : महिलांची व्यसनमुक्ती समिती गठित
गोंडउमरी : ग्रामपंचायतमध्ये महिलांची ग्रामसभा घेवून अवैध धंदे बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. त्यात ९० टक्के महिलांची व्यसनमुक्ती समिती गठित करून शुभांगी चांदेवार यांना अध्यक्षपद देण्यात आले. व्यसनमुक्त समिती व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पौर्णिमा भागवत चांदेवार या दोन्ही महिलांच्या नेतृत्वात गाव व्यसनमुक्त करणे, अवैध व्यवसाय बंद करून दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याकरीता रॅली काढण्यात आली. त्यात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
गोंडउमरी या गावात पूर्वी मोठ्या प्रमाणात २०-२५ दुकाने, पानटपरीत दारू विक्री केली जायची. अशा अवैध व्यावसायीकांना अभय देत होते. या भागात रोज मद्यपीची यात्राच भरत होती. दारूवाल्यांची दादागीरी वाढत होती. गावातील शाळकरी मुले, दारूच्या आहारी गेली होती. कित्येक कुटूंबियांना दारूचे ग्रहण लागले होते. परंतू वेळोवेळी निवेदने, ठराव देऊन पोलीस दारूची दुकाने सुरू राहण्याकरीता छूपा पाठींबाच देत होते. नंतर महिलांनी पुढाकार घेतला. तंटामुक्तीचे अध्यक्ष पोर्णिमा चांदेवार यांना केले. व्यसनमुक्ती समिती स्थापना करून शुभांगी चांदेवार यांना अध्यक्ष करीत या महिलांच्या नेतृत्वात धंद्यावाल्यांना धडा शिकविण्याचा चंग बांधला. आणि दारूबंदी केली. महिलांच्या नेतृत्वात गावात रॅली काढण्यात आली. या रॅलीत, अवैध दारू, सट्टापट्टी, जुगार बंद करणे, व्यसनाचे दुरूपयोग, दारूसोडा, संसार जोडा अशाप्रकारे घोषणा दिल्या. गावात जनजागृती करून महिलांना संघटीत केले. भागातली काही अंशी दारूबंदी झाल्याने इथले मद्यपी वांगी गावात जावून हौस भागवितात. त्यामुळे महिलांना त्रास होतो. दारूवाल्यांना पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप पोर्णिमा चांदेवार, शुभांगी चांदेवार यांनी केला. या रॅलीत लीला इरले, पुष्पा सयाम, आशा आगाशे, कुसुम चांदेवार, वृक्षाला मेश्राम, बबीता मोटघरे, सुकेसिनी मोटघरे, शांता राखडे, कमला राऊत, रंजना नेवारे, शालु मसराम यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)