वित्तीय कंपन्यांकडून महिलांची पिळवणूक
By Admin | Updated: September 16, 2014 23:32 IST2014-09-16T23:32:59+5:302014-09-16T23:32:59+5:30
ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना कर्ज देण्यासाठी काही खासगी कंपन्यांचे काम सुरू आहे. याचे अधिकची रक्कमही वसुल करतात. कर्जाची परतफेड दर आठवड्याला करण्यात येते. यासाठी महिलेने

वित्तीय कंपन्यांकडून महिलांची पिळवणूक
असहायतेचा फायदा : कारवाईची मागणी
मोहाडी : ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना कर्ज देण्यासाठी काही खासगी कंपन्यांचे काम सुरू आहे. याचे अधिकची रक्कमही वसुल करतात. कर्जाची परतफेड दर आठवड्याला करण्यात येते. यासाठी महिलेने उपस्थित राहावे, अशी सक्तीही करण्यात येते.
तुमसर शहरात जवळपास पाच ते सहा अशा फायनांस कंपन्यांनी आपले दुकान थाटले आहेत. या फायनांस कंपन््यांचे एजेंट तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील अतिगरजु कुटूंब शोधून त्यांना कर्ज देतात. कर्ज देताना कुटूंबातील फक्त महिलांनाच कर्ज मंजूर करण्यात येतो. मात्र त्यात पतीच्या संमतीचीही अट असते.
या फायनांस कंपन्या एका महिलेला कर्ज देत नाही त्यासाठी पाच पासून दहा महिलांचा एक गट तयार करूनच त्यांना एकमुश्त कर्ज देण्यात येतो. त्या गटातील प्रत्येक महिला एक दुसऱ्याची जामीनदार असते. या फायनांस कंपन्यांचा व्याजदर २४ ते २६ टक्के असतो. तसेच प्रोसेसिंग फी, विमा, सेवाकर इत्यादी प्रकारचे चार्जेस लावून अधिकचे पैसे उकळले जातात. दिलेल्या कर्जाची परतफेड कर्जानुसार २५० रूपया पाूसन ६५० रूपयापर्यंत दर आठवड्याला त्यांनी निश्चित केलेल्या दिवशी व ठिकाणी कर्ज घेणाऱ्या गटातील सर्व महिलांनी उपस्थित होऊन द्यावी लागते.
समूहातील एखादे महिलेने कर्जाची रक्कम पाठविली मात्र उपस्थित झाली नाही तर वसुली एजंट इतर महिलांना धमकावतो व दंडसुद्धा वसूल करतो.
एवढेच नाही तर पुढील आठवड्यात एखादा सण किंवा सुट्टी येत असली तर त्या आठवड्याची किस्त याच आठवड्यात भरण्याची शक्ती सुद्धा करण्यात येते. एकाच आठवड्यात दोन दोन किस्त भरताना या ग्रामीण महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या फायनांस कंपन्या सुलभ पद्धतीने कर्ज वाटप करीत असल्याने ग्रामीण जनता व्याजाचा दर न पाहता त्यांच्या आमिषाला बळी पडतात. मात्र कर्ज परतफेड केल्यावर कर्जाचे व्याजदर ३० ते ४० टक्के दराने द्यावे लागले हे नंतर समजते.
घरातील समस्या सोडविण्यासाठी किंवा काही कामे करण्यासाठी ग्रामीण जनता सुलभ पद्धतीने मिळणाऱ्या या कर्जाकडे वळतात. तसेच या फायनांस कंपन्यांच्या व्याजाकडे पाहात नाही. नंतर तीन किंवा चार फायनांस कंपन्या कडूनही कर्ज काढली जातात. यामुळे ग्रामीण भागातील जनता व्याजाच्या व कर्जाच्या डोंगराखाली दबत चालली आहे. एकाचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या कंपनीकडून व दुसरीचे कर्ज फेडण्यासाठी तिसऱ्या फायनांस कंपनीकडून कर्ज काढण्याची पद्धत वाढत चालली आहे. मात्र यामुळे त्या महिला शेवटपर्यंत कर्जातच राहणार याचे त्यांना भान नाही. (शहर प्रतिनिधी)