महिलांनी आत्मनिर्भर होणे गरजेचे!
By Admin | Updated: January 17, 2017 00:21 IST2017-01-17T00:21:46+5:302017-01-17T00:21:46+5:30
महिलांनी आत्मनिर्भर व्हावे. आपल्यातील ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. महिलांना सरपंच किंवा नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर ...

महिलांनी आत्मनिर्भर होणे गरजेचे!
सविता पुराम यांचे आवाहन : महिला संमेलन, सखी मंचचा उपक्रम
लाखनी : महिलांनी आत्मनिर्भर व्हावे. आपल्यातील ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. महिलांना सरपंच किंवा नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांच्या पदाचा फायदा त्यांचा नवरा आपल्यापरीने सर्व सूत्र चालवत असेल तर, यात महिला आरक्षणाचा पराभव म्हणता येईल. महिलांना सन्मानाचे पद मिळाल्यानंतर त्यांनी स्वत: जबाबदारीने कार्य करावे, असे प्रतिपादन सविता पुराम यांनी केले.
स्थानिक विवेकानंद वाचनालयात इंदिराबाई लाखनीकर यांच्या स्मृति प्रीत्यर्थ लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महिला संमेलन आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ.माधवी राखडे तर, प्रमुख अतिथी म्हणून कांचन गायकवाड, शीलाताई भांडारकर, डॉ. प्रणाली गिऱ्हेपंजे, शिवानी काटकर उपस्थित होते. डॉ. माधवी राखडे यांनी महिलांच्या आरोग्य विषयक प्रश्नावर मुक्त चर्चा करून महिला संमेलनास शुभेच्छा दिल्या. या एक दिवशीय महिला संमेलनात १५० हुन अधिक महिलांनी भाग घेतला. यात मनोरंजक खेळ घेण्यात आले. उखाणे, हास्य, आणि एक मिनिट स्पर्धा घेण्यात आली. यात सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजयी महिला स्पर्धकांना बक्षिसे वितरण करण्यात आले. तसेच हळदीकुंकू, तीळ गूळ व वाणही वितरण करण्यात आले. संचालन नेहा गभणे यांनी तर आभार शिवानी काटकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रंथपाल पवन पडोळे, विजय चेटुले, अशोक धरमसारे यांनी परिश्रम घेतले. (मंच प्रतिनिधी)