तुमसर तालुक्यात वीज कोसळून महिला ठार; एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 22:24 IST2021-06-07T22:22:28+5:302021-06-07T22:24:56+5:30
कविता मिथुन मेश्राम (२९, रा. आष्टी) असे मृत महिलेचे नाव आहे.

तुमसर तालुक्यात वीज कोसळून महिला ठार; एक गंभीर
तुमसर (भंडारा) : तालुक्यातील आष्टी येथे वीज कोसळून एक मजूर महिला ठार झाली, तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.
कविता मिथुन मेश्राम (२९, रा. आष्टी) असे मृत महिलेचे नाव आहे, तर बारनबाई भैय्यालाल केवट (६३, रा. आष्टी) अशी जखमी महिलेचे नाव आहे. या दोन महिला सोमवारी मूग तोडण्यासाठी शेतात गेल्या होत्या. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी त्यांनी झाडाचा आश्रय घेतला. त्यावेळी झाडावर वीज कोसळली. त्यात कविता आणि बारनबाई दोघेही जखमी झाल्या. त्यांना तत्काळ नाकाडोंगरी येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले.तेथे कविताला मृत घोषित करण्यात आले, तर बारनबाईवर उपचार सुरू आहेत.