मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मुत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 13:56 IST2019-10-29T13:56:25+5:302019-10-29T13:56:29+5:30
मधमाशांच्या हल्ल्याची तिव्रता पाहून परिसरातही कोणीही महिलेच्या जवळ येऊ शकले नाही.

मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मुत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : मधमाशांच्या हल्ल्यात ५५ वर्षीय महिलेचा मुत्यू झाल्याची घटना शनिवारी मेहकर तालुक्यातील बाभुळखेड येथे घडली.
तालुक्यातील बाभुळखेड येथील शशिकला माधव नरवाडे (५५) ही महिला गुरे चारण्यासाठी शेतात गेली असता लिंबाच्या झाडावरील आग्या मधमाशांनी तिच्यावर हल्ला केला. महिलांनी आरडाओरड केली, परंतू मधमाशांच्या हल्ल्याची तिव्रता पाहून परिसरातही कोणीही महिलेच्या जवळ येऊ शकले नाही. मधमाशांचा हल्ला हा वाढतच गेला. त्यामुळे शशिकला नरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्या नंतर गावातील काही मंडळींनी टेंभे करुन जाळ करुन मधमाश्यांना पळवुन लावले. परंतु तो पर्यंत खूप वेळ झाला होता. शशिकला नरवाडे यांच्या पश्चात दोन मुले आहेत.