महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST2021-06-20T04:24:07+5:302021-06-20T04:24:07+5:30

जांब (लोहारा) : वांगे तोडण्यासाठी शेतात मजुरीने गेलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील जांब येथे घडली. शुक्रवारी ...

Woman dies of snake bite | महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

जांब (लोहारा) : वांगे तोडण्यासाठी शेतात मजुरीने गेलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील जांब येथे घडली. शुक्रवारी दुपारी सर्पदंश झाला होता. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.

लक्ष्मी चतूर पावळे (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी ती इतर मजुरांसोबत केशव वाघमारे यांच्या शेतात वांगे तोडण्यासाठी गेली होती. वांगे तोडत असताना दुपारी १ वाजताच्या सुमारास तिला विषारी सापाने दंश केला. हा प्रकार लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. शेतातील इतर व्यक्तींनी तत्काळ तिला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी सकाळी १०.३० वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यामागे पती, तीन मुले असा परिवार आहे. या घटनेने जांब परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Woman dies of snake bite