दर घटूनही धानाची आवक वाढली

By Admin | Updated: December 12, 2015 00:33 IST2015-12-12T00:33:12+5:302015-12-12T00:33:12+5:30

धानाचे कोठार म्हणून राज्यात तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे.

Withdrawal also increased the number of arrivals | दर घटूनही धानाची आवक वाढली

दर घटूनही धानाची आवक वाढली

मार्केट यार्ड हाऊसफुल्ल : ऊस, गुळाचे कोठार असले तरी शेतकरी संकटात
मोहन भोयर तुमसर
धानाचे कोठार म्हणून राज्यात तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मागील दोन महिन्यात या बाजारपेठेत १ लाख ४५ हजार क्विंटल धान विक्रीकरिता आले. धानाला भाव नसूनही शेतकऱ्यांना नाईलाजास्तव धान विक्री करावी लागत आहे. जवळच्या मध्यप्रदेशातूनही येथे धान विक्रीला आणले जाते, हे विशेष.
१५ आॅक्टोंबर ते १० डिसेंबरपर्यंत तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावर जय श्रीराम, एचएमटी तथा इतर धान १.४५ लाख क्विंटल विक्री करण्यात आली. जय श्रीराम धानाचा प्रति क्विंटल भाव २१५०, एचएमटीचा १८५० ते १९५० व १०१० धानाचा भाव १२०० ते १२५० इतका आहे. धानाची आवक बाजार समितीत वाढली. भंडारा जिल्ह्यात धानाची मोठी व एकमेव बाजारपेठ आहे. मध्यप्रदेशातील शेतकरीही येथे धान विक्रीला आणतात. येथे गुळाची मोठी बाजारपेठ असून ऊसाचे नगदी पीक येथील शेतकऱ्यांनी सुरु केले. पंरतु ऊसाला भाव मिळत नसल्याने व सिंचन सोयी नसल्याने शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली. यावर्षी धान पिकाची उतारी नाही. धान पिकाचा दर्जा घसरला आहे. उत्पादन कमी व खर्च वाढला त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कर्ज काढून शेती केली तरीही खर्च निघाला नाही. बाजार समितीच्या मार्केट यार्डात एकाचवेळी आवक वाढल्याने धान ठेवायला जागा नाही. वजन काटा करण्याकरिता प्रतिक्षा करावी लागत आहे.
संचालक मंडळाला मुदतवाढ
येथील बाजार समितीच्या १९ सदस्यीय संचालक मंडळ दोनदा मुदतवाढ मिळाली आहे. दुसऱ्या मुदतवाढीचा कार्यकाळ डिसेंबरअखेरपर्यंत आहे. जिल्हा निबंधकांनी अद्ययावत मतदार याद्या मागितल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात बाजार समितीची निवडणूक होण्याचे संकेत आहेत. तत्पूर्वी येथे प्रशसकीय संचालक मंडळ नियुक्तीच्या हालचालींना वेग आला होता, परंतु त्यात यश आले नाही.

आठ कोटींच्या निधीची प्रतीक्षा
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुमसर बाजार समितीला भेट दिली होती. त्यावेळी बाजार समितीचा व्याप, कार्यक्षेत्र व समितीला होणारा नफा पाहून आठ कोटींचा निधी विविध विकास कामाकरिता देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले, आणि निधी अडला.
वेअर हाऊसची क्षमता कमी
धानाची आवक वाढली, पंरतु बाजार समितीच्या वेअर हाऊसची क्षमता एक हजार मेट्रीक टनाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल बऱ्याचदा उघड्यावरच ठेवावा लागतो. येथे शेतकऱ्यांकरिता शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. धान्य सुरक्षतेकरिता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर आहे.

Web Title: Withdrawal also increased the number of arrivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.