सर्व परवान्यांसाठी एक खिडकी योजना
By Admin | Updated: September 20, 2014 23:45 IST2014-09-20T23:45:12+5:302014-09-20T23:45:12+5:30
विधानसभा निवडणूक या कालावधीत निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना व राजकीय पक्षांना सर्व परवाने एका ठिकाणाहून उपलब्ध करुन देण्यासाठी एक खिडकी योजना राबवावी, असे निर्देश

सर्व परवान्यांसाठी एक खिडकी योजना
भंडारा : विधानसभा निवडणूक या कालावधीत निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना व राजकीय पक्षांना सर्व परवाने एका ठिकाणाहून उपलब्ध करुन देण्यासाठी एक खिडकी योजना राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी दिले.
विधानसभा निवडणूकीची पाहणी करण्यासाठी त्या तुमसर आणि साकोलीच्या दौ-यावर होत्या. यावेळी ई.व्ही.एम. स्टाँग रुम आणि मतमोजणी कक्षाची पाहणी करुन त्यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक कैलास कणसे, तुमसरचे उपविभागीय अधिकारी अशोक लटारे, व साकोलीचे उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, मोहाडीचे कल्याणकुमार डहाट, तुमसरचे सचिन यादव, साकोलीचे डॉ. हंसा मोहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार, उत्पादन शुल्क अधिक्षक नितीन धार्मिक उपस्थित होते. स्टाँग रुम आणि मतमोजणी होणार असल्यामुळे त्यासंदर्भात करावयाच्या आवश्यक उपाय योजनांचा त्यांनी आढावा घेतला. तुमसर येथे ३५१ मतदान केंद्र आणि साकोली येथे ३७१ मतदान केंद्र आहेत. त्यामुळे ई.व्ही.एम. ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम तयार करण्यासाठी सर्व खबरदारी घ्यावी अशा सूचना सर्व संबंधित अधिका-यांना दिल्या. मतदान केंद्र व स्ट्राँग रुमच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली आणि सुरक्षेसाठी तैनात असणा-या कर्मचा-यांसाठी राहण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. जिल्ह्याला लागून असलेल्या इतर जिल्ह्यांच्या सीमांवर चेक पोसट उभारावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत. या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष कुमारे, एच.एस. जाधव, पोलिस अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपस्थित होते.